Prashant Kishor on Nitish Kumar Sarkarnama
देश

Prashant Kishor: प्रशांत किशोर राजकीय संन्यास घेणार? JDU बाबतचं भाकीत खोटं ठरलं!

Bihar Result 2025 Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या जनसूराज पार्टी एकही जागा जिंकताना दिसत नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सर्व जागांसाठी ट्रेंड उपलब्ध झाले आहेत. एनडीए 207 जागांवर आघाडीवर आहे.

Mangesh Mahale

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. जनता दल (युनायटेड) म्हणजेच जेडीयू बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी म्हणून प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष मैदानात आहे. आत्तापर्यंत आलेल्या कलांमध्ये त्यांच्या उमेदवारांची कामगिरी निराशाजनक दिसत आहे. त्यांच्या जनसुराज पक्षाने खाते उघडलेले नाही.

पीकेंना (प्रशांत किशोर) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या पक्षाची कामगिरीच निराशाजनक नसून त्यांनी जेडीयूबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरत आहे. त्यामुळे पीकेंची राजकीय जीवन अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे केलेले भाकीत खोटे ठरले तर ते राजकारण सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

एनडीएने 207चा आकडा पार केला आहे. यामुळे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केलेले भाकीत, की जेडीयू 25 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, हे चुकीचे ठरले आहे. त्यांच्या जनसुराज्य पक्षाला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारात केवळ चार जागांवर आघाडी मिळाली आहे.

प्रशांत किशोर यांच्या जनसूराज पार्टी एकही जागा जिंकताना दिसत नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सर्व जागांसाठी ट्रेंड उपलब्ध झाले आहेत. एनडीए 207 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी अनेक जागांवर घसरताना दिसत आहे. जनसूराज पक्षाने 239 जागांवर उमेदवार उभे केले, पण त्यांना खाते उघडता आले नाही.सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये जन सूराज 4 जागांवर आघाडीवर राहून मागे पडले. पक्षाची मतांची टक्केवारीही 3-4 टक्क्यांच्या पुढे जाताना दिसत नाही.

एनडीए पुन्हा सत्तेत येण्याचे चिन्ह आहे. नितीशकुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित असतानाच त्यांचा पक्ष भाजपपेक्षा पुढे जाण्याच्या मार्गावर आहे. कधी भाजप तर कधी जेडीयू आघाडी घेत आहे. प्रशांत किशोर यांनी जेडीयूबाबत जे भाकीत केले होते, ते जेडीयूने खोटे ठरविले आहे. प्रशांत किशोर यांनी जेडीयू किती जागा मिळतील, यावर भाष्य केले होते. या जागांपेक्षा जेडीयूला तिप्पट जागा मिळत असल्याचे चित्र आहे, आता प्रशांत किशोर यांनी स्वत:शी लावलेली पैंज ते हारणार असल्याचे दिसते. त्यामुळे ते राजकारणातून संन्यास घेणार का? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.

काय म्हटले होते प्रशांत किशोर

जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा दावा केला होता. या निवडणुकीत जेडीयू 25 पेक्षा अधिक जागा जिंकणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. जेडीयूने आता 84 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पीके यांनी केलेल्या दाव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT