health minister mangal pandey maithili thakur Sarkarnama
देश

Bihar CM Samrat Chaudhary action on minister : मैथिली ठाकूर यांना समाधानकारक उत्तर न देणाऱ्या मंत्र्याला थेट माजी केलं : मुख्यमंत्री सम्राट चौधरींचा दणका

Minister removed after reply to Maithili Thakur : मैथिली ठाकूर यांना समाधानकारक उत्तर न देणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी थेट पदावरून हटवल्याची चर्चा रंगली आहे. बिहारच्या राजकारणातील या मोठ्या घडामोडीची सविस्तर माहिती वाचा.

Rashmi Mane

बिहारच्या राजकारणात आज मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून त्यात 32 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपकडून 15, जनता दल युनायटेडकडून 13 तर इतर सहयोगी पक्षांनाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले. मात्र या विस्तारात एक मोठं नाव गायब असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

माजी आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. विशेष म्हणजे, लोकगायिका आणि भाजप आमदार मैथिली ठाकूर यांनी काही महिन्यांपूर्वी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतरच ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.


या मंत्रिमंडळ विस्तारात मंगल पांडे यांना स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मंगल पांडे हे बिहारमधील अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी 2017 पासून आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळली होती. आरोग्य व्यवस्थेतील अनेक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र याच काळात सरकारी रुग्णालयांच्या दुरवस्थेचा मुद्दा वारंवार समोर येत होता.

काही महिन्यांपूर्वीच, आमदार मैथिली ठाकूर यांनी विधानसभेत आपल्या मतदारसंघातील रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. रुग्णालयाच्या इमारती म्हणजे 'कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे असे त्यांनी सभागृहात नमूद केले होते; असे असूनही, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र कोणतीही ठोस सुधारणा दिसून येत नव्हती. तत्कालीन आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिलेल्या उत्तराने मैथिली ठाकूर यांचे समाधान झाले नव्हते आणि त्यांनी सभागृहातच आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.

या प्रश्नोत्तरांमुळे विधानसभेचे वातावरण काही काळ तापले होते. त्यानंतर काही महिन्यांतच सत्तांतर झाले आणि सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली. त्यात मंगल पांडे यांना डच्चू देण्यात आल्याने, प्रशासनातील कामगिरी आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार आता अधिक कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश दिला जात असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT