

Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांच्यावर पत्नीला व मुलाला बेदम मारहाण आणि जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, हा गुन्हा दाखल केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी कारंडे यांनी पंधरा दिवसापुर्वीच घरगुती कारण सांगून ओएसडी पदाचा पदभार सोडला होता. त्यामागे असे काही कारण असेल याची कल्पना आपल्याला नव्हती. जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच मलाही खरे कारण समजले. या प्रकरणात पिडित भगीनीला निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल, तसेच कारंडे यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाईचे निर्देश आपण दिले असल्याचे 'सरकारनामा'ला सांगीतले.
अतुल सावे यांच्या ओएसडीने आपल्या पत्नी आणि मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, अशी मुजोर भाषा वापरल्याचेही बोलले जाते. कारंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अतुल सावे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आपली भूमिका सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली होती.
विजय कारंडे विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. या घटनेची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपले महायुती सरकार हे महिला संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आग्रही असते. या प्रकरणातही दोषी कठोर्तम शिक्षा मिळावी यासाठी वेगवान कार्यवाही होईल.
महिलांवरील अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या हीन प्रवृत्तींचा आम्ही कायम निषेध करतो आणि अशा कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी किंवा स्थान असणार नाही याविषयी अस्वस्थ करतो, असे स्पष्टीकरण दिले. या संदर्भात अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारंडे यांनी आपण घरगुती कारणामुळे ओएसडी पदाची जबाबदारी सोडत असल्याचे कळवले होते.
घरगुती कारण सांगितल्यामुळे आम्ही त्यांना पद मुक्त केले होते. परंतु या मागे असे काही घरगुती हिंसाचाराचे कारण होते, याची मला कुठलीही कल्पना नव्हती. गुन्हा दाखल झाल्यानंतरच मला हे समजले. अनेक ओएसडी हे चांगली संधी मिळाली की दुसरीकडे जातात, असेच काही तरी असेल असा माझा समज होता. परंतु कारंडे यांच्यावर पत्नी आणि मुलाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतरच मलाही हा प्रकार समजला, असे सावे यांनी सांगीतले.
ही घटना 30 एप्रिल रोजी सायंकाळी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थानी घडली. विजय कारंडे हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या 30 वर्षीय पत्नीने त्याबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. या कारणावरून कारंडे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. कारंडे यांनी रागाच्या भरात पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मध्ये पडला असता, आरोपीने पोटच्या मुलालाही सोडले नाही आणि त्याच्यावरही बॅटने हल्ला चढवला. असे तक्रारी नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.