CM Nitish Kumar Sarkarnama
देश

Bihar Vidhan sabha : भाजपच्या दोन आमदारांना अध्यक्षांनी सभागृहाच्या बाहेर काढले ; व्हिडिओ पाहा..

सरकारनामा ब्यूरो

Patna : बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे, आज (गुरुवारी) अधिवेशनाच्या चौथा दिवस हा वादळी ठरला. शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपच्या दोन आमदारांना अध्यक्षांनी सुरक्षा रक्षकांच्या सांगून सभागृहाबाहेर काढले. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते.

भाजपचे आमदार जीवेश मिश्रा, इंजीनियर शैलेंद्र यांनी सभागृहात शिक्षकगैरभरती प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी-विरोधक यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी सभागृहाच्या सुरक्षा रक्षकांना बोलावून या दोन आमदारांना बाहेर काढले. सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर जीवेश मिश्रा आक्रमक झाले.

"दहा लाख शिक्षकांच्या संबधीत या विषयावर मी मुद्दा उपस्थित केला होता. सभागृहात शांतेता हा मुद्दा मी मांडला. याबाबत तुम्ही सभागृहातील सीसीटिव्ही फुटेज पाहू शकतात. आमदारांना अशा पद्धतीने मार्शल आऊट करणे अयोग्य आहे. अध्यक्षांनी ही नवीन परंपरा सुरु केली आहे. शिक्षक भरतीत गैरव्यवहार झाल्याने लाखो शिक्षक नाराज आहेत. त्यांच्यावर सरकार अन्याय करीत आहे. मुख्यमंत्री नितीनकुमार यावेळी सभागृहात होते. अध्यक्ष हे सत्ताधाऱ्यांसाठी काम करीत आहे. ते पक्षपात करीत आहेत," असा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

आज अधिवेशनास सुरवात होताच भाजपच्या आमदारांनी या विषयावर जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यांची मागणी भाजपचे आमदार करीत होते. यावेळी गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी ही कारवाई केली. आपल्या दोन आमदारांना ही कारवाई झाल्यानंतर भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात घोषणा दिल्या. 'काका-पुतण्या चोर आहेत' अशा घोषणा यावेळी भाजप आमदारांनी दिल्या.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT