Patna News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाढलेले मतदार आणि ईव्हीएम घोळावरून विरोधकांनी रान उठवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत याच्या तक्रारी पोहचल्या आहेत. हा वाद सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका मतदारयादीत तब्बल 138 मतदारांच्या नावासमोर वडील म्हणून एकाच व्यक्तीचे नाव असल्याचे आढळून आले आहे.
बिहारमधील हा प्रकार पाहून निवडणूक अधिकारीही चक्रावले आहेत. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका बुथवरील मतदारयादीत मुन्ना कुमार या व्यक्तीचे नाव 138 जणांच्या नावासमोर वडील म्हणून नोंदविण्यात आले आहे. या प्रकारामुळे मतदारांसह उमेदवार आणि अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.
बिहारमधील विधान परिषदेच्या तिरहूत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयादीत हा घोळ झाला आहे. ही तांत्रिक चूक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी मतदानाच्या केवळ एक दिवस आदी हे समोर आल्याने उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
संयुक्त जनता दलाचे उमेदवार अभिषेक झा यांनी सांगितले की, अनेक मतदारांच्या नावासमोर एकाच व्यक्तीने वडील म्हणून नाव लागणे धक्कादायक आहे. हे कसे होऊ शकते? यामुळे माझ्या मतदारांना मतदान करण्यापासून रोखले जाऊ शकते, याची मला भीती वाटत असल्याचे झा यांनी म्हटले आहे.
तिरहूतचे विभागीय आयुक्त सर्वणन एम यांनी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वत केले आहे. मतदारयादीत आता आम्ही बदल करू शकत नाही. पण मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत की, वोटिंग आयडी किंवा योग्य ओळखपत्र असलेल्या मतदारांना मतदान करू दिले जावे. निवडणूक झाल्यानंतर या घोळाची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.