
New Delhi News: रस्ते अपघात रोखण्यासाठी देशभरात विविध उपाययोजना करून त्यामध्ये काही फरक पडला नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही याबाबत हतबलता व्यक्त करताना लोक कायद्याचा आदर करत नाहीत, त्यांना कायद्याची भीती नाही, असे सांगितले. यावेळी यांनी आपल्या अपघाताचा अनुभवही सांगितले.
लोकसभेत रस्ते अपघातांवर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरींनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोक कायद्याचा आदर करत नाहीत, कायद्याची भीतीही त्यांना नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. हेल्मेट न घातल्याने दरवर्षी 30 हजार जणांचा मृत्यू होतो. रस्त्यांच्या नियमांचे पालन व्हायला हवे. ते होत नसल्याने अपघात अधिक होतात. मी स्वत: भोगले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असताना अपघातात माझा पाय चार ठिकाणी तुटला होता.
मी याबाबत संवेदनशील आहे. हे स्वीकारण्यात मला संकोच वाटत नाही, तर दु:ख होत आहे. आम्ही प्रयत्न करूनही दीड लाखांचा मृतांचा आकडा यावेळी 1 लाख 68 हजार झाला आहे. लोक आणि समाजाचे सहकार्य तसेच मीडियाच्या मदतीशिवाय यात बदल होणार नाही. आम्ही दंडाची रक्कम वाढली.
रोड सेफ्टी बिलामध्ये सगळे केले. पण तरीही लोक नियमांचे पालनही करत नाहीत. यामध्ये राज्य आणि केंद्राचीही भूमिका आहे. पण कुणावर आरोप करत नाही. मी स्वत:ला दोषी मानतो. आम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले.
देशात पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होत होता. पण अनेक उपाययोजना करूनही हा आकडा यावर्षी एक लाख 68 हजारांवर गेला आहे. हे लोक कोणत्याही दंगलीत किंवा लढाईल मेलेले नाहीत, असे सांगताना गडकरी यांनी सर्व खासदारांना आवाहनही केले.
प्रत्येक खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. तब्बल 40 हजार ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. ही खूप गंभीर समस्या आहे. आपल्या जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन गडकरींनी केले.
काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये झालेल्या एका अपघाताची माहिती दिली. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित वाटले असते. राष्ट्रीय महामार्गांवर कायद्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी अपघातांमागची कारणे सांगितले. ते म्हणाले, अपघात झालेल्या रस्त्यांसह देशभरात अनेक रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट असून सरकारने त्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रोड इंडिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिरिंग, कायद्याची अंमलबजावणी आणि लोकशिक्षणाचा अभाव ही रस्त्यांवर अपघातामागे चार कारणे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.