Sarkarnama
Sarkarnama
देश

Manish Kashyap : यूट्यूबर मनीष कश्यप यांचा भाजपामध्ये प्रवेश; म्हणाले 'आईचा शब्द टाळू शकत नाही'

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : बिहारमधील चर्चित यूट्यूबर मनीष कश्यप यांनी आज(गुरुवार) भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. मनीष कश्यप यांनी म्हटले की, माझे विचार भाजपाशी जुळतात. त्यामुळे मी भाजपात प्रवेश करत आहे. खरंतर मी भाजपा प्रवेश करू इच्छित नव्हतो, मात्र भाजपा नेते मनोज तिवारी यांनी माझ्या आईला फोन करून मला भाजपात सहभागी होण्यास सांगितले आणि मी माझ्या आईचं बोलणं टाळू शकत नाही.

मनीष कश्यप(Manish Kashyap) यांच्या समर्थकांद्वारे हाही अंदाज वर्तवला जात आहे की, ते आगामी काळात विधानपरिषद निवडणूक लढतील. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या, यूट्यूबर मनीष कश्यप यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आधी कश्यप भाजपा नेते मनोज तिवारींसोबत(Manoj tiwari) दिल्लीला पोहचले होते. जिथे त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांनी सांगितले की भाजपासमोर ज्या अटी मांडण्यात आल्या त्या सर्व त्यांनी मान्य केल्या आहेत. माझी लढाई भाजपाशी नव्हतीच, कारण माझे विचार भाजपाशी चांगल्याप्रकारे जुळतात.

मनीष कश्यप यांच्या भाजपात प्रवेशानंतर भाजपा(BJP) खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, मनीष कश्यप यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या. मनीष कश्यप यांनी जनतेच्या समस्यांचे मुद्दे उचलेले आहेत. त्यांनी सदैव मोदींच्या समर्थनात भाष्य केलं. मात्र काही पक्षांनी त्यांनी अतिशय दु:ख दिले आणि भाजपाने त्यांनी नेहमीच साथ दिली. तर मनीष कश्यप म्हणाले की, मी तुरुंगात होतो तेव्हा माझी लढत होती. माझ्या आईला माहीत आहे कोणी-कोणी मदत केली. आईने म्हटले की मनोज भैय्यांचा शब्द टाळायचा नाही

पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावरून डॉक्टर संजय जयसवाल निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसकडून मदन मोहन तिवारी यांना उमेदवारी आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये घमासान सुरू असताना, मनीष कश्यप यांनी अपक्ष म्हणून या लढाईत उडी घेतली होती. त्यांचा नागरिकांमध्ये सातत्याने संपर्क वाढत होता, त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT