Nitish Kumar Help Himachal :  Sarkarnama
देश

Nitish Kumar Help Himachal : 'हिमाचल'च्या मदतीला धावला बिहार ; मुख्यमंत्री नितीश कुमारांची आपत्तीग्रस्तांना मदत !

Chetan Zadpe

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशात १२ ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये मंडी जिल्ह्यात मोठे नुकसान घडून आले. प्रचंड पावसामुळे भूस्सखलनाच्या घटना घडल्या होत्या. येथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यानंतर या ठिकाणी पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मदतकार्यात राजकारण होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

हिमाचल प्रदेशात भूस्खलन होऊन अतोनात नुकसान झाले होते. आता हिमाचल प्रदेशच्या मदतीसाठी बिहार राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पुनर्वसन व मदतीसाठी बिहार राज्य सरकारकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून येथील मदत व पुनर्वसनाच्या कामासाठी पाच कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाल्याने गेल्या महिन्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर या ठिकाणी पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. हिमाचल प्रदेशात सतत पडणाऱ्या पावसामुळे जीवित हानी व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हिमाचलच्या मदतीसाठी बिहार राज्याने पुढाकार घेतला आहे, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट करीत मी माझ्या राज्याकडून मदत करीत असल्याचे स्पष्ट केले.

दोन दिवसापूर्वीच हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कामाची पाहणी केली होती. येथे आपत्तीग्रस्तांना मदत करताना पक्षीय राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले होते. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने यावर नाराजी व्यक्त करत प्रियांका गांधी यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT