Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

Marathwada Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले.
NCP News Parbhani
NCP News ParbhaniSarkarnama

Parbhani Political News : परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सर्वात जास्त ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची होती. (NCP News) मात्र, अजित पवार यांनी उभारलेल्या बंडाच्या झेंड्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी विस्कटून गेली आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते.

NCP News Parbhani
Parbhani Thackeray Group: परभणीत `खाना`कडेच बाण; चिन्हाशिवाय ठाकरेंच्या सेनेची कसोटी...

वरिष्ठ नेत्यांशी संपर्क झाल्यानंतर परभणी जिल्हा अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी, राज्यसभा सदस्य खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपण शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याची भूमिका जाहीर केली. (Parbhani) तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत राहणे पसंत केले.

तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे नातेवाईक माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीसुद्धा अजित पवार यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. (Marathwada) परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांनीही अजित पवार यांना साथ देण्याचे ठरवले. जिल्ह्यातील युवा नेतृत्व अजित पवारांसोबत गेल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता उघडपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांमध्येही बेबनाव उघडपणे दिसून आलेला आहे.

विशेषतः शहर जिल्हाध्यक्ष नेमणूक करताना प्रकरण प्रदेश पातळीवर गेले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणी दौऱ्यानंतर अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र, मुंबई येथे त्यांची समजूत काढल्यानंतर ते सक्रिय झाले. मात्र, पाथरी येथील त्यांचे खंदे समर्थक असलेले दादासाहेब टेंगसे व चक्रधर उगले यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणी येथे आले होते. परभणीतील कार्यक्रम आटोपून ते बीडकडे रवाना झाले.

या वेळी पाथरी येथे बाबाजानी दुर्राणी यांच्या चिरंजीवांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली असली तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाबद्दल सुप्त आकर्षण असल्याचेही बोलले जात आहे. एकूणच अजित पवार यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची घडी विस्कटली असून, येत्या काळात त्यात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com