Verdict in one day.
Verdict in one day. Sarkarnama
देश

बलात्कार प्रकरणात एका दिवसात सुनावणी अन् थेट जन्मठेपेची शिक्षा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : एकीकडे न्यायालयात लाखो प्रकरणांवर वर्षानुवर्षे सुनावणी सुरू राहत असताना एका पोक्सो (POCSO) न्यायालयाने इतिहास घडवला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात (Rape Case) न्यायालयाने एका दिवसांत सुनावणी पूर्ण करून आरोपीला थेट जन्मठेपेची शिक्षाही सुनावणी आहे. साक्षीदारांचे जबाब, दोन्ही बाजूच्या वकिलांचे प्रतिवाद, उलट तपासणी एका दिवसांत पूर्ण करत न्यायालयाने एक आदर्श घालून दिला आहे.

बिहारमधील अररिया येथील पोक्सो न्यायालयाने देशात पहिल्यांदाच असा निकाल दिल्याचे सांगितले जात आहे. हा निकाल ता. 4 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आला असला तरी त्याची सविस्तर ऑर्डर दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाली आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश शशीकांत राय यांनी ही शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेच्या शिक्षेबरोबरच त्यांनी आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

पीडित मुलीला पीडित भरपाई निधीतून सात लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ता. 22 जुलै रोजी आठ वर्षांच्या पीडित मुलीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी 23 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यानंतर ता. 4 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यात आला. बिहार सरकारच्या गृह विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

कदाचित हा पहिला असा निकाल असावा. त्याआधी मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील न्यायालयाने तीन दिवसांत सुनावणी पूर्ण करून निकाल दिला होता. आता बिहारमध्ये एका दिवसांत सुनावणीपूर्ण करत हा विक्रम केला आहे. दरम्यान, राय यांनी आपल्या वीस पानी निकालपत्रात म्हटले आहे की, चौकशी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपास गुन्हा सिध्द होत आहे. त्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहे.

सरकार वकील शामलाल यादव यांनी सांगितले की, 23 जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो कायद्यानंतर आरोप निश्चित करण्यात आले. त्यानुसार 24 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. अररिया महिला पोलिस ठाण्याच्या रिटा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यात आली होती, असे यादव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT