नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशानाला (Parliament Winter session) सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार प्रत्येक विषयावर खुली चर्चा करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकार देईल. पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांची प्रतिष्ठेबाबत चांगले आचरण व्हावे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशात यानिमित्त रचनात्मक सकारात्मक जनहितासाठी, राष्ट्रहितासाठी सामान्य नागरिक अनेक कार्यक्रम करत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी जी स्वप्न पाहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिकही आपले कर्तव्य पार पाडत आहेत. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे शुभ संकेत आहेत.
मागील काही दिवसांत आपण पाहिले आहे की, संविधान दिनही संपूर्ण देशाने एक संकल्प म्हणून साजरा केला आहे. यापार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक सामान्य नागरिकही संसदेच्या अधिवेशनात देशहितासाठी चर्चा करावी, अशी अपेक्षा करत आहे. देशाच्या प्रगतीसाठी नवे मार्ग शोधावेत, नवे उपाय शोधावे, यासाठी हे अधिवेशन खूप समृध्दीचे, दुरगामी प्रभाव निर्माण करणारे, सकारात्मक निर्णय घेणारे व्हावे, असे मोदी म्हणाले.
भविष्यात संसदेला कसे चालवले, किती चांगला सहभाग घेतला, यावर तोलले जावे. कुणी किती जोर लावून रोखले, याच्याशी तुलना केली जाऊ नये. किती तास काम झाले, किती सकारात्मक काम झाले, असे मानदंड असावेत. सरकार प्रत्येक विषयावर खुली चर्चा करण्यासाठी तयार आहे. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहे, असे मोदींनी स्पष्ट केलं. सरकारविरोधात, सरकारी धोरणांविरोधात जितका आवाज उठवावायचा आहेत तेवढा उठवावा. पण पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांची प्रतिष्ठेबाबत चांगले आचरण व्हावे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.