Lawrence Bishnoi Gang Sarkarnama
देश

Aamir Khan: अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन बिश्नोई गँगची धमकी; धमकीचा ऑडिओ व्हायरल

Aamir Khan: अभिनेता आमिर खान नुकताच तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला, त्याच्या या तिसऱ्या लग्नाची सोशल मीडियात बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती. अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली.

Amit Ujagare

Aamir Khan: अभिनेता आमिर खान नुकताच तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला, त्याच्या या तिसऱ्या लग्नाची सोशल मीडियात बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती, अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली. आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी असलेल्या बिश्नोई गँगनं आमिर खानला कथीतरित्या एका ऑडिओ क्लीपद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कथित लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्यानं ही धमकी दिल्याचं कळतंय.

आमिर खानला काय दिलीए धमकी?

"जय श्री सीताराम सर्व बांधवांना! मी आरजू बिश्नोई लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ आरजू बिश्नोई. हे जे आपल्या संस्कृतीविरोधात देशात आमिर खान सारखे लोक लव्ह जिहादसारख्या प्रकाराला प्रोत्साहन देत आहेत. यासाठी आमिर खानला हा इशारा आहे की, अशा प्रकारच्या गोष्टी कधीही सहन केल्या जाणार नाहीत. आमिर खानला आणि त्याच्या सहकाऱ्यांना इशारा आहे की, लवकरच यांचा श्वास दाबला जाईल जिथंही हे लोक भेटतील त्यांना अशा चमत्कार दाखवू की हे लोक लक्षात ठेवतील. यापुढे अशा प्रकारचे उद्योग करण्याधी हे लोक विचार करतील"

दरम्यान, बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी देणाऱ्या ऑडिओ क्लीपची सरकारनामा कुठलीही पुष्टी करत नाही. कारण थेट आमिर खानच्या फोनवर ही धमकी आल्याचं दिसून येत नाही. केवळ एका ऑडिओ क्लीपद्वारे असा संदेश देण्यात आला आहे. पण यावर अद्याप आमिर खानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसंच त्यानं या कथित जीवे मारण्याच्या धमकीविरोधात पोलिसांत तक्रार केल्याचंही अद्याप समोर आलेलं नाही.

बिश्नोई गँगनं आजवर कोणाला धमक्या दिल्या?

सलमान खान :

१९९८च्या काळवीट शिकार प्रकरणामुळं बिश्नोई गँगच सलमान खानविरोधात दीर्घकाळ वैर आहे. २०१८ मध्ये जोधपूर कोर्टात त्याला बिश्नोई गँगनं धमकी दिली होती. २०२२ मध्ये सिद्दू मूसेवाला हत्येनंतरही सलमानला धमकीचं पत्र आलं होतं. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या वांद्र्च्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या अनेक लोकांनाही बिश्नोई गँगनं टार्गेट केलं आहे.

सिद्दू मूसेवाला :

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची मे २०२२ मध्ये पंजाबमध्ये या गँगनं हत्या केली होती. त्याचा मॅनेजर शगनप्रीत सिंह यालाही धमकी देण्यात आला होता.

गिप्पी ग्रेवाल :

गिप्पी ग्रेवाल याच्या कॅनडातील घराबाहेर बिश्नोई गँगनं २०२३ मध्ये गोळीबार केला होता. सलमान खानशी संबंधित असल्यानं हा हल्ला करण्यात आला होता.

रोहित शेट्टी :

त्यानंतर २०२५-२६ मध्ये बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील घराबाहेर बिश्नोई गँगनं गोळीबार केला होता. हा तर केवळ एक ट्रेलर आहे असं सांगून त्यानतंरही रोहितला धमक्या आणि खंडणीची मागणीही करण्यात आली होती.

रणवीर सिंह :

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह याच्याकडं खंडणीची व्हॉइस नोट आणि १ कोटी रुपये खंडणी बिश्नोई गँगनं मागितली होती, या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँच करत आहे.

आयुष शर्मा :

सलमान खानच्या बहिणीचा नवरा असलेला आभिनेता आयुष शर्मा याला देखील बिश्नोई गँगकडून धमकी ईमेल आला होता.

कपिल शर्मा :

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यालाही बिश्नोई गँगनं आजवर धमकी दिली आहे, त्याच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. सलमानशी संबंधित असल्याच्या कारणानं त्याला धमकी देण्यात आली होती.

मुन्नावर फारुकी :

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुखी यालाही बिश्नोई गँगनं दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हल्ल्याचा प्लॅन केला होता पण गुप्तचर यंत्रणांनी हे कारस्थान उधळून लावलं होतं.

एपी ढिल्लों :

एपी ढिल्लों याच्या व्हँकुव्हर घराबाहेर गोळीबार याच वर्षी गोळीबार करण्यात आला होता. तसंच सलमान खान सोबत स्टेज शेअर केल्यानं त्याला भोजपुरी स्टार पवनसिंह यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच प्रसिद्ध पॉप सिंगर बादशाह याच्या एका गाण्यामुळं निर्माण झालेल्या वादानंतर बिश्नोई गँगनं त्यालाही धमकी दिली होती.

बाबा सिद्धकी हत्या :

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि बाबा सिद्दीकी यांची वर्षभरापूर्वी बिश्नोई गँगनं गोळ्या झाडून हत्या केली होती. इथं देखील सलमान खानशी त्यांचे जवळचे संबंध असल्यानं त्यांचा जीव घेतला गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT