

Nilesh Chandra : जैन मुनी निलेशचंद्र हे वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात, मराठी माणसांवर टीकात्मक बोलल्यानं अनेकदा त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावताना एक विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे राम आहेत, असं विधान त्यांनी केलं असून यामुळं पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
"रामरक्षा तर लोक आपल्या घरी करत असतात रोडवर थोडीच करतात रामरक्षा रोडवर तर नमाज पढली जाते. स्वर्गामध्ये इंद्र, केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आहेत. या देवाभाऊला दाबवण्यासाठी हा प्रयत्न उद्धवसाहेबांचा आहे. पण मला हे माहिती आहे की, महाराष्ट्राचा राम जर कोणी असेल तर ते केवळ आमचे देवेंद्र फडणवीस आहेत" असं विधान जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलं आहे.
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दानचोरीविरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत. यासाठी पक्षाकडून नागपूरमध्ये तयारीही करण्यात आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनाही यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडं, ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप 22 जुलैला देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरात महायज्ञ करणार आहेत, यामुळं नागपूरमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.