Vasundhara Raje, cp joshi Sarkarnama
देश

Rajsathan Election : राजस्थानात बंडोबामुळे भाजपच्या २३ जागा डेंजर झोनमध्ये; सत्तेची समीकरणे जुळवताना होणार कसरत

BJP 23 seats danger zone in Rajasthan : भाजप व काँग्रेसमध्ये चुरस असली तरी 23 विधानसभा मतदारसंघात भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.

Sachin Waghmare

Rajsathan Vidhansabha Election : लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणचा प्रचार शिगेला पोहाेचलेला आहे. प्रचारासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने या ठिकाणी भाजप व काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भाजप व काँग्रेसमध्ये चुरस असली तरी 23 विधानसभा मतदारसंघात भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या या जागा सद्यःस्थितीत डेंजर झोनमध्ये दिसत आहेत.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 23 मतदारसंघांत भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. भाजपने बंड करणाऱ्या 23 उमेदवारांसह त्यांच्या समर्थक नेत्यांना निलंबित केले आहे. मात्र, याचा फारसा फरक त्यांना पडलेला नाही. हकालपट्टीनंतरही या बंडोबांनी रिंगणातून माघार घेतलेली नाही. त्यामुळे या ठिकाणच्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी ही निवडणूक अडचणीची ठरत आहे.

बंड करणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे समर्थक असलेले कैलास मेक वाघ, मनोज खान, राजेंद्र भांबू, प्रियंका चौधरी, शिमला बावरी, आशा मीना, अशोकसिंह रावत, जीवराम चौधरी यांचा समावेश आहे. चंद्रभान सिंह, रवींद्रसिंह पाटील हे सीपी जोशी यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत.

14 मतदारसंघांत भाजपची खरी लढत बंडखोरांशी

बंडखोरी झालेल्या 23 उमेदवारांना निलंबित केले असले तरी त्यापैकी 14 मतदारसंघांत भाजपची खरी लढत बंडखोरांशी होणार आहे. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 29 मतदारसंघांत दौरे केले आहेत. मात्र, त्या बंड केलेल्या समर्थक उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी गेल्या नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 23 मतदारसंघांतील लढतीत जर भाजपला पराभव स्वीकारावा लागला, तर निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे जुळवताना भाजपला नाकीनऊ येणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT