Rajasthan Elections : राहुल गांधी, अशोक गेहलोत अन् सचिन पायलट यांच्यात रंगला 'पहले आप..., पहले आप...'चा खेळ!

Rajasthan Elections Rahul Gandhi in Jaipur : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधी जयपूरमध्ये दाखल झाले आहेत...
Rahul Gandhi, Ashok Gehlot, Sachin Pilot
Rahul Gandhi, Ashok Gehlot, Sachin PilotSarkarnama

Rajasthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे निघाले. या वेळी तिन्ही नेत्यांमध्ये "पहले आप, पहले आप..." चा प्रसंग घडला.

Rahul Gandhi, Ashok Gehlot, Sachin Pilot
Sonia Gandhi News : सोनिया गांधी दिल्ली सोडून जयपूरला पोहोचल्या; प्रदूषण की राजकारण, काय आहे नेमकं कारण?

राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात घडलेला 'पहले आप'चा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला गेला. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिन्ही नेते एकमेकांना पुढे जाण्यास सांगताना दिसत होते आणि 'पहले आप...' म्हणताना दिसून आले. या वेळी राजस्थानमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासराही दिसून आले. या वेळी 'पहले आप..., 'पहले आप...' प्रसंग घडला.

माध्यमांचे प्रतिनिधी समोर येताच राहुल गांधींनी संवाद साधला. आम्ही फक्त सोबत दिसत नाही, तर एकजूटही आहोत आणि एकत्र राहू. राजस्थानमध्ये काँग्रेस निवडणूक जिंकेल, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे हसताना दिसले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमध्ये मतदानापूर्वी सगळेच सोबत येऊन जनतेसमोर एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर काँग्रेस समोर सर्वात मोठं आव्हान हे गेहलोत आणि पायलट गटातील कलह. यामुळे २०२० मध्ये राज्य सरकार संकटात आलं होतं. आपसातील रस्सीखेचचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष एकजूट असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

भाजपविरोधातील लढाईत पक्ष एकजूट आहे, यावर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडून भर दिला जात आहे. गेहलोत यांनी यापूर्वी एक फोटोही शेअर केला होता. एकजूट आणि पुन्हा जिंकणार, अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली होती. राहुल गांधी मंगळवारी आई सोनिया गांधी यांच्यासोबत जयपूरमध्ये पोहोचले. सोनिया गांधी यांचा हा वैयक्तिक दौरा असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi, Ashok Gehlot, Sachin Pilot
MP Election 2023 : गद्दार..., प्रियंका गांधींचा ज्योतिरादित्यांवर घणाघात; पार्टटाईम नेत्या म्हणत शिंदेंचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com