Supreme Court on The Kerala Story
Supreme Court on The Kerala Story Sarkarnama
देश

Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली ; The Kerala Story बंदच ; भाजप आक्रमक..

सरकारनामा ब्यूरो

The Kerala Story Supreme Court : वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात बंदी घातली होती. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं ही बंदी उठवली. चित्रपटगृह मालकांनी प्रेक्षकांना पोलीस सुरक्षा देऊन हा चित्रपट सुरु ठेवावा, असा आदेश दिला आहे. (bjp amit malviya ON west bengal mamata banerjee the kerala story supreme court theatre)

तृणमूल काँग्रेसच्या भीतीचा धसका घेतलेल्या पश्चिम बंगालमधील चित्रपटगृहमालकांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे,

त्यामुळे ‘द केरला स्टोरी’चे राज्यातील चित्रपटगृहातील खेळ बंद आहेत. यावर भाजपने टीएमसीवर आरोप करीत सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या आय-टी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी याबाबत टि्वट केलं आहे. "सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' वरील बंदी उठवल्यानंतरही राज्याची राजधानी कोलकातामधील एकाही थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होत नाही. स्थानिक प्रशासनाकडून थिएटर मालकांना 'दंडात्मक कारवाई'ची धमकी दिली जात असल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट चालू असलेल्या स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते. “द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT