BJP, Congress Sarkarnama
देश

BJP Congress Alliance : सत्तेसाठी कायपण! भाजप आणि काँग्रेस आघाडीचा 'या' राज्यात सुरू होता प्रयत्न, पण...

BJP Congress alliance attempt : देशात आणि राज्यात सत्ता स्थापन करणं आणि त्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करणं हे सध्याच्या राजकीय नेत्यांचं सूत्र ठरलं आहे. त्यासाठी मग प्रसंगी पक्षाच्या विचाराधारा आणि तत्वांना देखील तिलांजली दिली जाते. याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला मागील तीन वर्षापासून चांगलाच आला आहे.

Jagdish Patil

BJP Congress Alliance : देशात आणि राज्यात सत्ता स्थापन करणं आणि त्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करणं हे सध्याच्या राजकीय नेत्यांचं सूत्र ठरलं आहे. त्यासाठी मग प्रसंगी पक्षाच्या विचाराधारा आणि तत्वांना देखील तिलांजली दिली जाते. याचा अनुभव महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला मागील तीन वर्षापासून चांगलाच आला आहे.

कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली जवळीक राज्यासाठी अनपेक्षित होती. तर पुन्हा भाजपने सत्तेत आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी केलेली युती देखील सर्वांना आश्चर्यचकीत करणारी होती. त्यामुळे सध्या युती-आघाडीच्या नावाखाली कोणता पक्ष कोणाशी युती करेल हे सांगणं कठीण झालं आहे.

मात्र, देशाच्या राजकारणात एकमेकांचे परंपरागत विरोधी पक्ष असलेले भाजप आणि काँग्रेस (Congress) या दोन राष्ट्रीय पक्षांनी अद्याप तरी सत्तेसाठीयुती-आघाडी केलेली नाही. मात्र, पंजाबमध्ये हा देखील प्रयोग करण्याच्या हालचाली स्थानिक नेत्यांनी सुरू केल्या होत्या. पंजाबमधील एका महानगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला होता.

पण याबाबतची माहिती भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना समजताच त्यांनी या हालचाली त्वरीत थांबवण्यास सांगितल्यामुळे हा प्रयत्न फसला. पंजाबमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. तर लुधियाना महानगरपालिकेमध्ये 95 पैकी सर्वात जास्त 43 जागा जिंकून आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

त्या खालोखाल काँग्रेसला 30 तर भाजपने 19 जागा जिंकल्या. मात्र, यापैकी कोणत्याच पक्षाला 48 हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पालिकेत सत्तास्थापनेसाठी आपला 5 नगसेवक कमी पडत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपचे मिळून 49 नगरसेवक आहेत. त्यामुळे आपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याबाबतची माहिती भाजपचे पंजाब प्रभारी विजय रुपाणी यांना समजताच त्यांनी याला विरोध केला. याबाबतच्या बातम्या समोर येताच पंजाबमधील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू यांनी काँग्रेस आणि भाजपच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. तसंच काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT