BJP  Sarkarnama
देश

BJP Politics : BJP ने जाहीर केले 9 राज्यांचे कारभारी! 20 प्रदेशाध्यक्ष बदलणार

BJP State Presidents Announced: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्या केल्या जात आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी वातावरण निर्माण केले जात आहे.

Mangesh Mahale

भारतीय जनता पार्टीने 20 राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. भाजपने महाराष्ट्रासह 9 राज्यातील प्रदेशाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपने महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पुड्डुचेरी, मिजोरम, अंडमान-निकोबार आणि मध्य प्रदेशात नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. अन्य राज्यातील प्रदेशाध्यक्षांची नावेही लवकरच जाहीर होणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्या केल्या जात आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी वातावरण निर्माण केले जात आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, मनोज सिन्हा आणि डॉ. के. लक्ष्मण ही पाच नावे राष्ट्रीय अध्यक्षांसाठी स्पर्धेत आहेत. या नावाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सकारात्मक असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएएस (RSS)यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तींची या पदावर वर्णी लागेल, अशी चर्चा आहे.

  • महाराष्ट्र :रविंद्र चव्हाण

  • तेलंगणा : एन रामचंद्रराव

  • आंध्र प्रदेश : पीवीएन माधव गारू

  • उत्तराखंड :महेंद्र भट्ट

  • हिमाचल प्रदेश :राजीव बिंदल

  • पुड्डुचेरी: वी पी रामलिंगम

  • मिजोरम :के बेचुआ

  • अंदमान निकोबार :अनिल तिवारी

  • मध्य प्रदेश :हेमंत खंडेलवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT