Karnataka CM: सिध्दरामय्याचं मुख्यमंत्री राहणार! या 7 कारणांमुळे त्यांची खूर्ची वाचली! डी.के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले

Siddaramaiah retains CM post due to 7 key reasons: डी. के. शिवकुमार यांचे समर्थक मुख्यमंत्री बदलणार असे उघडपणे सांगत असताना अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला वापरा, असेही त्याचे मत आहे.
D. K. Shivakumar & Siddaramaiah
D. K. Shivakumar & SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यामागे 100 आमदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थक आमदारांनी केला होता. त्यानंतर कर्नाटकात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

डी.के.शिवकुमार यांचे समर्थक मुख्यमंत्री बदलणार असे उघडपणे सांगत असताना अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला वापरा, असेही त्याचे मत आहे. या वादात कर्नाटकाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पडदा टाकला आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री बदलण्याची कोणतीही परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या हेच राहतील, असे बैठकीत ठरल्याने डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार हे स्पष्ट केले आहे.

1

डि.के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी प्रदेशाध्यक्ष सोडावे, त्याच्या जागी त्यांच्या समर्थकाची नियुक्ती करावी, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे म्हणणे आहे. पण डि.के. यासाठी तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा पुढे जोरदारपणे गेला नाही.

2

येत्या आँक्टोबरमध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे, अशातच दलित समाजातून निवडून आलेल्या नेत्याला काँग्रेस मुख्यमंत्री पदावरुन कसे हटवणार, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याची निर्णय पक्षश्रेष्ठींनी आँक्टोबरपर्यंत टाळला आहे.

D. K. Shivakumar & Siddaramaiah
Valmik Karad: वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; नाशिक कारागृहात हलवणार

3

आरसीबीने आईपीएल जिंकल्यानंतर आयोजित कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली, त्यांचा खापर डि.के. शिवकुमार यांच्यावर फोडण्यात आले आहे. टीमच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात ते सर्वात पुढे होते. त्यांनी आंनदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, हा खटला सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने डि.के. शिवकुमार यांच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदापासून अलिप्त ठेवलं आहे.

4

डि.के. शिवकुमार यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा फेरा आहे. ते जेलवारीही करुन आले आहेत. ते मुख्यमंत्री झाले अन् सीबीआय किंवा ईडीनं त्यांना अटक केली तर काय होईल, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी उपस्थित केला आहे.

D. K. Shivakumar & Siddaramaiah
Sharad Pawar Strategy: शरद पवार यांची रणनीती

5

मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर डि.के. शिवकुमार हे नक्कीच विराजमान होतील, पण सध्या ती वेळ आलेली नाही, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना सांगितले आहे. ते सोनिया गांधी यांच्या शब्दाबाहेर नसल्याने या मुद्यांवर अडून बसणार नाही, हे स्पष्ट आहे.

6

सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदावर अजून काही काळ राहीले तर ते सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होईल. त्यानंतर ते राजीनामा देऊन राजकीय सैन्यास घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

7

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या होमटाऊनमधील राजकारणात खूप रस आहे. 50 वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक पदावर काम केले. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. सध्याच्या वातावरणात दोघांच्या भांडणात त्यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल , अशी आशा मल्लिकार्जुन खर्गे यांना आहे. त्यामुळे सध्या तरी या सिद्धरामय्या यांच्या खूर्चीला कुठलाही धोका नाही, हे स्पष्ट आहे. काही दिवसानी या मुद्यांवरुन पुन्हा लढाई सुरु होईल, यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com