Bhupen Bora BJP join Sarkarnama
देश

BJP political News : 50 खोके एकदम ओके? मुख्यमंत्री भेटलेल्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश अन् व्हिडीओ व्हायरल...

Bhupen Bora BJP join : काँग्रेसचे नेते गौरव गौगोई यांनी बोरा यांच्यावर ५० कोटींची डील झाल्याचा आरोप केला होता.

Rajanand More

Political controversy in India : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आसाममधील पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याच्या राजकारणातील हा मोठा उलटफेर मानला जात आहे. दरम्यान, बोरा यांच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियात ५० कोटींच्या डीलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भूपेन बोरा यांनी शनिवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही उपस्थित होते. बोरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मुख्यमंत्री काही तासांतच त्यांच्या घरी गेले होते. त्यामुळे त्याचवेळी बोरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, भूपेन बोरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते सांगताना दिसत आहे की, एक स्टेडियम बनविण्याचे वडिलांचे स्वप्न होते. त्यासाठी १२ कर जमीन वेगळी ठेवली होती. दोनदा आमदार होऊनही त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही.

२०१९ मध्ये वडिलांचे निधन झाले. ५० कोटी रुपयांतून अत्याधुनिक स्टेडियम बनू शकणार नाही. पण कुणी एवढे पैसे दिले तर मीडियासमोर त्याचा स्वीकार करून काम सुरू करू, असे बोरा हे बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

काँग्रेसचे नेते गौरव गौगोई यांनी बोरा यांच्यावर ५० कोटींची डील झाल्याचा आरोप केला होता. त्यावरून बोरा यांनी पीटीआयशी बोलताना तीन दिवसांपूर्वी हे आरोप फेटाळून लावले होते. याउलट त्यांनी भाजपने ५० कोटी दिले तरी मीडियासमोर त्याचा स्वीकार करेन, असे म्हटले होते. तेवढेही पैसे स्टेडियमसाठी पुरणार नाहीत, पण त्यातून मी काम सुरू करे, असेही बोरा यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT