AI Simmit protest row : तुम्ही आधीच नागडे! अखेर PM मोदीही तुटून पडले, 'त्या' कृतीबद्दल कट्टर विरोधकांचे मानले जाहीरपणे आभार

PM Narendra Modi statement : एकीकडे देशातील लोक भारताला विकसित करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. पण देशातील काही राजकीय पक्ष भारताचे यश पचवू शकत नाहीत, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
narendra modi (1).jpg
narendra modi (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

Youth Congress protest : मागील काही दिवसांपासून नवी दिल्लीत सुरू असलेली AI समिट चांगलीच गाजत आहे. सुरूवातीलला एका विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबोट आपण बनविल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मोदी सरकार बॅकफूटवर गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगातील शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत मोठा गोंधळ घातला. या प्रकारावरून मित्रपक्षांसह अनेकांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

मित्रपत्रांकडून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या काँग्रेसवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुटून पहिले. या प्रकारावर त्यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून काँग्रेसविरोधातील त्यांचा संताप स्पष्टपणे जाणवत होते. अत्यंत तिखड शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, एआय समिटमध्ये काँग्रेसने घाणेरडे आणि नागडे राजकारण केल. त्यांनी सर्व मर्यादा तोडल्या. एआय समिट भाजपचा कार्यक्रम नव्हता. तो देशाचा कार्यक्रम होता. देशाच्या सन्मानाचा कार्यक्रम होता. आज संपूर्ण देशात काँग्रेसच्या या राजकारणावर थूथू होत आहे. पण दुर्दैव पाहा, एवढा जूना पक्ष असूनही लाज वाटण्याऐवजी ते त्याचा गाजावाजा करत आहेत.

narendra modi (1).jpg
Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे शरद पवारांविषयी ट्विट; म्हणाल्या, पवार साहेबांचे मार्गदर्शन...!

एकीकडे देशातील लोक भारताला विकसित करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. पण देशातील काही राजकीय पक्ष भारताचे यश पचवू शकत नाहीत. एआय समिटमध्ये जगभरातील ८० हून अधिक देशांतील प्रतिनिधी दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने आणि त्यांच्या इकोसिस्टीमने भारताच्या एका आंतरराष्ट्रीय आयोजनाला घाणेरड्या आणि नागड्या राजकारणाचा आखाडा बनविले, असे टीका मोदींनी केली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेसचे नेते कपडे काढून पोहचले. मी काँगेसच्या नेत्यांना विचारू इच्छितो, तुम्ही आधीपासूनच नागडे आहोत, हे देशाला माहिती आहे. मग कपडे काढण्याची गरज काय होती, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेस हल्ला चढविला.

narendra modi (1).jpg
IAS in Bihar : धडाकेबाज मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याला बिहारमध्ये विरोधकांनी घेरलं; सरकार ठामपणे बाजूने उभे...

लोकसभेतील गोंधळावर मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केले. ते म्हणाले, महिला खासदारांना पाठवून आसनावर कब्जा करत तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही. आया-बहिणींना पुढे करावे लागण्याची वेळ तुमच्यावर आली आहे, तुम्ही एवढे निर्ढावले आहात का, असेही मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशासाठी ओझे बनली आहे. पण त्यातही एक चांगली बाब म्हणजे दिल्लीतील घटनेनंतर काँग्रेसच्या सर्व मित्रपक्षांनी काँग्रेसवर टीका करण्याची हिंमत दाखविली. मी त्यांचे आभार मानतो, असेही मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com