BJP Performance Peak news Sarkarnama
देश

BJP MLA Maximum: राजधानी जिंकल्यानंतर भाजपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आणखी एक रेकॉर्ड

BJP Performance Peak: भाजपने 31 विधानसभापैकी 20 विधानसभांमध्ये आमदारांची संख्या वाढली आहे. आसाम आणि नागालॅड येथेही आमदारांची संख्या कायम ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे.

Mangesh Mahale

Delhi News: राजधानी दिल्ली जिंकल्यानंतर भाजपने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. दिल्ली जिंकल्याच्या आनंदात भाजपच्या देशातील एकूण आमदारांची संख्या वाढली आहे. सध्या देशात 4हजार 111 आमदार आहेत. त्यात भाजप आमदारांची संख्या सर्वात जास्त आहे.

एकूण आमदारांमध्ये सर्वाधिक आमदार म्हणजे 39.7 टक्के आमदार हे भाजपचे आहेत. यात मणिपूरचाही समावेश आहे. कारण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवड लागू असली तरी येथील विधानसभा भंग झालेली नाही.

दिल्लीवर 26 वर्षांनंतर भाजपने झेंडा फडकावला आहे. लोकसभेच्या दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या आहेत. देशात मोदी सरकार असताना मात्र दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सत्तेमुळे भाजपला अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. आता भाजपने दिल्ली जिंकल्यानंतर दिल्लीच्या विकासासाठी भाजपने मोठा मास्टर प्लॅन आखला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बैठकांचा सिलसीला सुरु केला आहे.

देशातील एकूण 4 हजार 111 आमदारांपैकी 1 हजार 634 आमदार भाजपचे आहेत. 1980 नंतर राज्यातील आमदारांची संख्या स्थिर असून यात वाढ होत आहे. तर दुसरीकडे 1989 मध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या सर्वाधिक होती. तेव्हा काँग्रेसचे 47.5 टक्के आमदार हे काँग्रेसचे होते.

मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपने 31 विधानसभापैकी 20 विधानसभांमध्ये आमदारांची संख्या वाढली आहे. आसाम आणि नागालॅड येथेही आमदारांची संख्या कायम ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. 16 राज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत.

भैरोसिंह शेखावत यांच्या रुपाने राजस्थानमध्ये 1990 मध्ये भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला होता. सध्या उत्तराखंड, दिल्ली, यूपी, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा, महाराष्ट्र, असम, अरुणाचल प्रदेश, मणिपुर (राष्ट्रपति राजवट), त्रिपुरा येथे भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT