Bihar Bjp News Sarkarnama
देश

BJP News: भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का, निष्ठावान नेत्यालाच फोडलं; गंभीर आरोप करत पक्षाला ठोकला रामराम

Bihar Politics: बिहार विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडालेल्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी 16 जुलै रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मृत्युंजय तिवारी हे लालू यादव यांच्या निकटवर्तीय मानले जातात.

Deepak Kulkarni

Bihar News: बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्टीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या बड्या नेत्यानं 360 अंशात आपलं राजकारण फिरवलं आहे. आरजेडीचे माजी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. या त्यांच्या पक्षांतरामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडालेल्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी 16 जुलै रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मृत्युंजय तिवारी हे लालू यादव यांच्या निकटवर्तीय मानले जातात.

आरजेडीच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या मृत्युंजय तिवारी यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. लालू यादव यांनी त्यांना ही जबाबदारी दिली होती. प्रवक्ते म्हणून आरजेडी पक्षाची कायमच भक्कमपणे बाजू मांडण्या ते नेहमीच पुढे होते.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमारांच्या जनता दलानं (जेडीयू) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच जनसुराज पक्षाच्या नेत्यांनी कमळ हाती घेतले होते.

आरजेडीच्या रितू जयस्वाल यांनी यापूर्वी भाजपची वाट धरली होती. आता मृत्युंजय तिवारी यांनीही आरजेडी आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली आहे. ते भाजपच्या गोटात दाखल झाले आहे. त्यांनी भाजपमध्ये पाऊल ठेवताच यादव पिता-पुत्रावर गंभीर आरोप केले आहेत.

मृत्युंजय तिवारी यांनी आरजेडीचा राजीनामा दिल्यानंतर एक व्हिडिओ स्टेटमेंट प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी 2014 पासून पक्षात आपली जबाबदारी पार पाडत होते, परंतु त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा आदर केला गेला नाही. पक्षातील काहीजण वाळवीप्रमाणे पक्षाला पोखरत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही.

तेजस्वी यादव यांच्याकडे वारंवार आपल्या चिंता व्यक्त केल्या होत्या, परंतु असे असूनही त्यांनी आपल्या तक्रारींची दखलच घेतली नसल्याचा आरोपही तिवारी यांनी केला. स्वतःला एक समर्पित कार्यकर्ता म्हणून संबोधत त्यांनी अपमानित होत असताना राजकारणात भाग घेता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

तसेच राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी नेते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपमध्ये सामील होण्याच्या निर्णयाचं समर्थन केले. ते म्हणाले, भाजपने नेहमीच राष्ट्रीय हिताचे निर्णय घेतले आहेत आणि धर्माच्या रक्षणासाठी काम केले आहे. त्यामुळे, देश, धर्म आणि राज्याच्या हितासाठी काम करणाऱ्यांसोबत उभे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. से ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT