

Bangladesh News: बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं बांगलादेशात एकच खळबळ उडाली आहे. पद सोडताना त्यांनी गंभीर आरोग्य समस्यांचे कारण दिलं आहे. त्यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली. मात्र, शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यापाठीमागं वेगळंच कारण असल्याचं बोललं जात आहे.
बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी एप्रिल 2023 पासून 76 वर्षीय शहाबुद्दीन हे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातच बांगलादेशमध्ये 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक आंदोलन पेटलं होतं. या आंदोलनादरम्यानच तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली.आता पुन्हा एकदा शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
राष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याद्वारे एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या निवेदनात त्यांनी "अलीकडील वैद्यकीय तपासणीत मला ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी (Autonomic Neuropathy) हा आजार असल्याचं निदान झाल्याची माहिती दिली आहे. या आजारामुळे मला अधूनमधून काही क्षणांसाठी शुद्ध हरपण्याचा त्रास होत असल्याचं म्हटलं आहे. हे निवेदन त्यांच्या प्रसार सचिवांनी प्रसिद्ध केले.
बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी पदाची शपथ घेतली आहे. अन्वर यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये असलेला माजी पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांचा आणखी एक सहकारी सत्तेतून बाहेर पडला आहे. शहाबुद्दीन यांचा राजीनामा हा शेख हसीना यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बांगलादेशमध्ये 2024 मधील उसळलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्तरंजित आंदोलनानंतर शेख हसीना यांचं सरकार कोसळलं होतं. याच आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यानंतर तेथील हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या पक्षाशी संबंधित अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे किंवा ते भूमिगत झाले आहेत.
शेख हसिना यांनी देश सोडला होता. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे लंडनच्या दौऱ्यावर असताना शेख हसिना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठ्या वादात सापडले होते.
बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शेख हसिना यांनी देश सोडला होता. ज्यावेळी शहाबुद्दीन हे प्रकृतीच्या कारणास्तव लंडनच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी शेख हसीना यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शहाबुद्दीन हे वादात सापडले होते. राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
यापूर्वी शेख हसीना यांचे माजी सहकारी असलेले राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन शुक्रवारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ही शक्यता खरी ठरली असून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशात राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख तसेच सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती असतात. मात्र, प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असतात. बांगलादेशची लोकसंख्या सुमारे 17.3 कोटी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.