Keral News: पुढील वर्षी केरळ विधानसभा निवडणुका होत आहेत.त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजधानी तिरुवनंतपुरमच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत तब्बल 101 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. दक्षिण भारतात आणि तेही कट्टर विरोधी राष्ट्र राहिलेल्या केरळच्या राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमच्या महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याच्या भाजपच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरमच्या महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला विजय मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.13 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरमच्या महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.त्यामध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महापालिकेतील एकूण 101 प्रभागांपैकी 50 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी एका जागेची आवश्यकता होती.
पण त्याचदरम्यान, तिरुवंतपुरम महापालिकेतील विझिंजम प्रभागातील मतदान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अपघातात अपक्ष उमेदवार जस्टिन फ्रान्सिस यांचं निधन झाल्यामुळे या जागेसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून विझिंजम प्रभागातील पोटनिवडणुकीची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घोषणा केली होती.
केरळची राजधानीत सत्तेच्या खुर्ची खेचून आणण्यासाठी भाजपाने या पोटनिवडणुकीतील विजयासाठी जंग जंग पछाडले होते. महापालिकेत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या एका जागेची आवश्यकता होती. पण आता भाजपचं तिरुवनंतपुरमच्या महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याचं स्वप्नं भंगण्याची शक्यता निर्माण झालं आहे. विझिंजम प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी(ता.14) मतदान पार पडले. त्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा पराभवाचा हादरा बसला.
विझिंजम प्रभागातील पोटनिवडणुकीत हाती आल्यानंतर भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. या पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत काँग्रेसप्रणित संयु्क्त लोकशाही आघाडीचा (यूडीएफ) उमेदवार विजयी झाला आहे. कारण भाजपनं 50 जागा असून सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (मार्क्सवादी) केवळ 29 जागा जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ)केवळ 19 जागांवरच समाधान मानावे लागले होते.उर्वरित 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.
दिल्ली, बिहारमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपनं आता आपला मोर्चा हा पुढच्या वर्षी होत असलेल्या पश्चिम बंगाल,आसाम तसेच दक्षिणेकडील केरळ,तामिळनाडू या राज्यांकडे वळवला आहे. या राज्यांतील निवडणुकांमधील विजयासाठी भाजपनं जोरदार कंबर कसली आहे. पश्चिम बंगालसह केरळ तामिळनाडूमध्ये भाजपला (BJP) दणदणीत कामगिरी करता आलेली नाही.पण आता भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वीच केरळ (Keral) राज्यात मोठा धमाका केला होता.
भाजपनं केरळमध्ये धडाक्यात एन्ट्री करतानाच डाव्यांच्या 45 वर्षांच्या सत्तेलाच सुरुंग लावला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं शुक्रवारी (ता.26) ऐतिहासिक विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत तब्बल 50 जागा जिंकत भाजपनं डाव्यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे.
केरळच्या राजधानीत भाजपनं पहिल्यांदाच कमळ फुलवत महापौरपद खेचून आणण्यासाठी ताकद लावली होती. तिरुवनंतपुरम नगरपालिका निवडणुकीत भाजपनं दमदार कामगिरी केली होती. 45 वर्षांपासून लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटच्या ताब्यात असलेला बालेकिल्ल्यालाही सुरूंग लावण्यात मोठं यश भाजपला मिळालं होतं. 101 सदस्य असलेल्या या महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
केरळच्या राजकारणात भाजपनं नवा इतिहास रचला होता. गेल्या 45 वर्षांपासून या महापालिकेवर डाव्यांच्या (CPM) वर्चस्व राहिलं होतं. भाजपनं मिळवलेला हा दणदणीत विजय हा डाव्यांना मोठा झटका मानला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.