Election Crime News: अत्यंत संतापजनक! निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी एक ना दोन तब्बल 500 कुत्र्यांची हत्या,राजकारण हादरलं

Election 2026 News : तेलंगणा राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये एकाच आठवड्यात एक ना दोन तब्बल 500 कुत्र्यांची क्रूरपणे संपवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या.
Street Dog Crime  (1).jpg
Street Dog Crime (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Telangana News: राज्यात नगरपालिका अन् नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर मुंबई, पुण्यासह 29 महापालिकांसाठी गुरुवारी (ता.15) मतदान होत असून शुक्रवारी (ता.16) निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभा, पत्रकार परिषदा, मुलाखती, रोड शो यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याचदरम्यान, एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

तेलंगणा राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये एकाच आठवड्यात एक ना दोन तब्बल 500 कुत्र्यांची क्रूरपणे संपवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुका (Election) नुकत्याच पार पडल्या. मात्र, निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांनी गावकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी 500 भटक्या कुत्र्यांची विषप्रयोग करुन हत्या करण्यात आली आहे.

आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाच सरपंचाचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी ते निवडून आल्यास भटक्या कुत्र्यांच्या व माकडांच्या त्रासातून गावाला मुक्त करण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. निवडून येताच दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याठी निवडणुकीचा निकाल लागताच क्रूरपणे कुत्र्‍यांना संपवण्यात आलं.

काही प्राणी मित्रांनी या घटनेप्रकरणी गंभीर आरोप करतानाच गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच सरपंचांनी संबंधित कुत्र्यांना विष देऊन मारण्यासाठी सुपारी दिल्याचा म्हटलं आहे.या प्रकरणी माचारेड्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार प्राणी कल्याण कार्यकर्ते अडुलापुरम गौतम यांनी दाखल केली आहे.

Street Dog Crime  (1).jpg
Nashik NMC Election : मंत्री गिरीश महाजनांना अडवणं भोवलं, सिडकोतील बाप लेकावर पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेत आरोप करण्यात आलेल्या सरपंचांनी एका व्यक्तीला बोलावून संबंधित कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांतील फरीदपेठ,वाडी, बांदारामेश्वरपल्ली, भवानीपेठ या पाच गावांमध्ये कुत्र्यांची सामूहिक हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर या कुत्र्यांचे मृतदेह कचऱ्याप्रमाणे फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता.

Street Dog Crime  (1).jpg
Arvind Sawant Aggressive : ठाकरेंचा खासदार पोलिसांना नडला, गुन्हा दाखल नसताना तडीपार आदेशामुळे संतापला! मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा!

आता या क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या घटनेप्रकरणी माचारेड्डी पोलिसांकडून सहा जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.त्यानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन पशुवैद्यकीय पथकांकडून करण्यात आले आहेत.या घटनेविरोधात वन्यजीवप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com