Nitish Kumar and Narendra Modi
Nitish Kumar and Narendra Modi  Sarkarnama
देश

नितीश कुमारांची इच्छापूर्ती? बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री अन् JD(U) चे २ उपमुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी व्यक्त केलेल्या एका इच्छेने देशात मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. आपल्याला राज्यसभेत जायला आवडेल, असे नितीश कुमार काल म्हणाले आहेत. त्यांच्या राज्यसभेत (Rajya Sabha) जाण्याच्या याच इच्छेनंतर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. नितीशकुमार यांचा सहकारी पक्ष भाजपने नितीशकुमार यांची ही इच्छा पूर्ण करुन राज्यात आपला मुख्यमंत्री बसवतो येतो का याची चाचपणी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

२०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपच्या (BJP) मदतीने नितीशकुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. सध्या ते बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. तर यापूर्वी ते लोकसभेचे खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे आता केवळ राज्यसभेचे सदस्य पद त्यांना मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एका टप्प्यावर राज्यसभेचे सदस्य व्हायचे आहे, असं स्पष्ट केले आहे.

नितीश कुमार यांनी राज्यसभेची इच्छा व्यक्त केल्याने ७७ जागांसह सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी दिसू लागली आहे. याशिवाय नितीश कुमार सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, दारुबंदी अशा मुद्द्यावरुन वादात सापडले आहेत, त्यांच्या या प्रतिमेचा फायदा उचलत नितीश कुमार यांना त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीय राजकारणात पाठवून भाजपचा मुख्यमंत्री आणि जनता दलाचे दोन उपमुख्यमंत्री असा काहीसा प्लॅन बिहारमध्ये सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत बोलताना भाजपचे दिग्गज नेते आणि आमदार हरि भूषण ठाकूर म्हणाले की, नितीश कुमार यांची राज्यसभेची इच्छा भाजप पूर्ण करेल, आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री बनेल तर जनता दलाचा उपमुख्यमंत्री. यासाठी नावांची देखील चर्चा सुरु आहे. यात मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांचे नाव आघाडीवर आहे तर दोन उपमुख्यमंत्री पदासाठी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंगेरचे खासदार ललन सिंह आणि बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री विजय चौधरी, मंत्री श्रवण कुमार यांची नावं आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT