BJP Kishtwar Candidate Shagun Parihar Sarkarnama
देश

BJP Kishtwar Candidate Shagun Parihar: दहशतवाद्यांकडून वडील अन् काकांची हत्या; भाजपने तिकीट दिलेल्या शगुन परिहार कोण?

Rashmi Mane

BJP Candidate List : भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शगुन परिहार यांचे नाव जाहीर केले आहे. शगुन परिहार यांना किश्तवाड विधानसभेतून भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत शगुन परिहार या एकमेव महिला उमेदवार (Women Candidate) आहेत.

शगुन या जम्मू-काश्मीरचे भाजपचे माजी सचिव अनिल परिहार (Anil Parihar) यांच्या भाची आहेत. अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ अजित परिहार (शगुनचे वडील) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अनिल परिहार आणि अजित परिहार (Ajit Parihar) यांची 1 नोव्हेंबर 2018 रोजी दुकानातून परतत असताना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अनिल परिहार यांची किश्तवाडमधील भाजपच्या ताकदवान नेत्यांमध्ये गणना होते. त्यांनी कलम 370 विरोधातही (Article 370) आवाज उठवला होता.

तिकीट मिळाल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शगुन परिहार यांनी भाजपच्या (BJP) केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. किश्तवाडचे लोक त्यांना साथ देतील आणि त्यांना खुल्या मनाने स्वीकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ शगुन परिहार नाही, अजित परिहार किंवा अनिल परिहार यांची नाही, तर त्या सर्व शहीदांच्या कुटुंबीयांची आहे ज्यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बलिदान दिले. ही निवडणूक किश्तवाडच्या त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांना येथे शांतता आणि बंधुभाव हवा आहे, असेही त्या म्हणाल्या.

भाजपवर नामुष्की; नेत्यांच्या नाराजीमुळे उमेदवारी यादी मागे, 15 जणांची नवी लिस्ट केली जाहीर

आज ( 26 सोमवार) सकाळी भाजपने जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र काही वेळाने भाजपने ती यादी रद्द करून दुसरी यादी जाहीर केली जाईल, असे सांगितले. काही वेळातच भाजपने 15 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. म्हणजे आतापर्यंत जम्मू-काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केवळ 15 उमेदवारांची घोषणा केली आहे.

25 ऑगस्टला झाली होती बैठक

25 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, राजकारणातील पुढील मुद्दे, उमेदवारांची नावे आणि पंतप्रधान मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर विशेष चर्चा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT