BJP councillors Sarkarnama
देश

BJP Councillors Oath : हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; भाजपच्या 20 नगरसेवकांची शपथ ठरविली अवैध, देशभरातील 'पॅटर्न' बदलणार?

Kerala High Court, Thiruvananthapuram Corporation : ईश्वर या शब्दाचा आवाका वाढवून विशिष्ट देवी-देवता, भारत माता, राजकीय आंदोलनातील शहीद व्यक्त, संघटना किंवा अन्य व्यक्तींना शपथेशी जोडणे कायद्याविरोधात आहे. शपथ केवळ औपचारिकता नाही.

Rajanand More

BJP Councillors Controversy : आमदार, खासदार असो की नगरसेवक किंवा मंत्रिपदाची शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, महापुरूषांची नावे, राजकीय नेते, विविध संघटनांची नावे घेतली जातात किंवा घोषणा दिल्या जातात. काहीवेळा संबंधितांना रोखण्यात येऊन नियमानुसारच शपथ घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता हायकोर्टाने अशाप्रकारचे शपथग्रहण अवैध ठरविले आहे. कोर्टाचा हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे.

केरळ हायकोर्टाने शपथेबाबत बुधवारी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या तिरूवनंतरपुरम महापालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला होता. या विजयानंतर नगरसेवकांचा शपथविधी दिमाखात पार पडला होता. यावेळी २० नगरसेवकांनी शपथ घेताना हिंदू देवी-देवता, भारतम्बा, भारत माता, गुरुदेव, राजकीय आंदोलनातील शहीदांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या शपथेवर आक्षेप घेणारी याचिकाही होती. या दोन्ही प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी म्हटले की, केरळ नगरपालिका अधिनियम, केरळ पंचायच कायद्यानुसार, शपथ घेण्याचे दोनच पर्याय आहेत. पहिला ईश्वराच्या नावाने शपथ घेणे आणि दुसरा म्हणजे ईश्वराचे नाव न घेता सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा करणे.

ईश्वर या शब्दाचा आवाका वाढवून विशिष्ट देवी-देवता, भारत माता, राजकीय आंदोलनातील शहीद व्यक्त, संघटना किंवा अन्य व्यक्तींना शपथेशी जोडणे कायद्याविरोधात आहे. शपथ केवळ औपचारिकता नाही. जनतेप्रती ही वचनबध्दता आहे की, निवडून आलेला प्रतिनिधी घटनेचे पालन करेल, कायद्यानुसार काम करणे, प्रामाणिकपणे जनतेची सेवा करेल. त्यामुळे कायद्यानुसार अपेक्षित शपथच योग्य मानली जाईल, असे हायकोर्टाने निकाल देताना स्पष्ट केले.

दरम्यान, कोर्टाने निकालामध्ये शपथ अवैध ठरविली असली तरी संबंधित नगरसेवकांची सदस्यता कायम राहणार आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, त्यांना पुढील चार आठवड्यात पुन्हा शपथ घ्यावी लागेल, असा आदेश कोर्टाने दिला. ग्रामपंचायत सदस्याने केलेली कामे मात्र कोर्टाने केरळ पंचायत कायद्यानुसार अवैध ठरविली आहेत. मात्र, पद सुरक्षित राहील. त्यांनाही चार आठवड्यात शपथ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT