Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत विधानसभेतच खळबळजनक दावा; 250 कोटी रुपयांची जुळवाजुळव...

Jitendra Awhad, Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांच्या जीवाचे बरेवाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पहिल्यांदाच बाजारातून सगळं गायब झालंय, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
Tukaram Mundhe crackdown on adulteration mafia
Tukaram Mundhe crackdown on adulteration mafiaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. भेसळखोरांवर दररोज धाडी टाकल्या जात असून शेकडो जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. राज्यभर त्यांच्या या कारवाईचे कौतुक होत असून पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. बुधवारी मुंढे यांच्या बदलीबाबत विधानसभेत खळबळजनक दावा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही भीती व्यक्त केली आहे. सुरूवातीला विधानसभेत बोलताना ते म्हणाले, एफडीए हा विभाग महाराष्ट्रभर चर्चेत आणणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढेंचे मनापासून अभिनंदन करावे वाटते. कारण महाराष्ट्राला कॅन्सरने घेरणाऱ्या लोकांना रिंगणात आणणारा हा माणूस आहे, त्यांची काळजी घ्या. मंत्र्‍यांचेही अभिनंदन करतो, कारण अजूनपर्यंत त्यांच्या बदलीची फाईल घेऊन ते मुख्यमंत्र्‍यांपर्यंत केले नाहीत.

ड्रग्ज कंपनी, ज्या मुंढेंमुळे कामाला लागल्यात, त्यांनी त्यांच्या बदलीसाठी २५० कोटी रुपये जमा केलेत. सगळे कामा-धंद्याला लागले आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे, असा दावा आव्हाड यांनी विधानसभेत केला. त्यानंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले, पाकिटांचे कार्यालय एवढेच या विभागाला म्हणता येईल. अख्या महाराष्ट्रात गुटखा कोण फिरवतं, हे मी सोमवारी सगळं उघड करणार आहे.

Tukaram Mundhe crackdown on adulteration mafia
Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंना महत्वाच्या पदावरून हटविले; दोन सचिवांची जिल्हा प्रशासनात नियुक्ती...

झिरवाळ यांच्यासारख्या साध्या माणसावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जातोय. एवढं सुरू असताना आता तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया २५० कोटी रुपये जमवतायेत. मुंढे यांच्या जीवाचे बरे-वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पहिल्यांदाच बाजारातून सगळं गायब झालंय, असा दावा आव्हाड यांनी केला.

Tukaram Mundhe crackdown on adulteration mafia
Anjali Nimbalkar : मला बळीचा बकरा बनविले! पक्षाच्या नेत्यांवर संतापलेल्या माजी आमदार अंजली निंबाळकर कोण आहेत?

सध्याच्या परिस्थितीत भेसळ हे कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. त्यात जर एखादा अधिकारी महाराष्ट्राला वाचविणार असेल, तर आता जनतेनेही त्यात लक्ष घालावे. हे सगळं मी मंत्र्‍यांच्या निदर्शनास आणले आहे. आशा एवढीच आहे की, कुणाच्या दबावाखाली येऊन सरकार तुकाराम मुंढेंची विकेट काढणार नाही, हे आता बघायचं आहे, असे आव्हाड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com