Atar Singh Bhadana murder Sarkarnama
देश

Former BJP MLA death : भाजपच्या माजी आमदाराची गावकऱ्यांनीच केली निर्घृण हत्या; 70-80 लोकांकडून लाठ्याकाठ्यांनी मारहाण...

Atar Singh Bhadana murder, former BJP MLA, Bharatpur murder case, Bharatpur crime news : गावकरी आणि क्रशर चालकामध्ये यापूर्वीच अनेकदा वाद झाला आहे. खाणकामाविरोधात आंदोलनेही करण्यात आली होती.

Rajanand More

Rajasthan news : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गावातील वादातून स्थानिक लोकांनीच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत भाजपच्या माजी आमदाराची हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण राजस्थान हादरले आहे.

माजी आमदार आणि राज्यातील गुर्जर समाजाचे मातब्बर नेते अतर सिंह भडाना यांची हत्या झाली आहे. भरतपूर जिल्ह्यात वैर भागातील डोंगराळ भागात भडाना यांच्याशी संबंधित स्टोन क्रशर प्लँट आहे. त्यावरूनच मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून वाद सुरू होता. स्थानिकांकडून या प्लँटला विरोध केला जात होता.

गावकरी आणि क्रशर चालकामध्ये यापूर्वीच अनेकदा वाद झाला आहे. खाणकामाविरोधात आंदोलनेही करण्यात आली होती. रविवारी सांयकाळी अतर सिंह भडाना हे पत्नीसह खाणकामाच्या ठिकाणी पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्याठिकाणी अचानक त्यांना गावातील ७० ते ८० लोकांना गराडा घातला. यावेळी भडाना यांच्यासोबत शस्त्रधारी सुरक्षारक्षकही होता.

हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याने सुरक्षारक्षकाला काहीच हालचाल करता आली नाही. त्यांच्यासह भडाना यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. जबर मार लागल्याने भडाना गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना जयपूरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कोण आहेत अतर सिंह भडाना?

अतर सिंह भडाना हे मुळचे हरियाणातील असून प्रामुख्याने पूर्व राजस्थानमध्ये त्यांचे राजकीय प्राबल्य होते. २००३ मध्ये बयाना विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, २००८ च्या निवडणुकीत काँग्रसेच्या तिकीटावर त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT