Abhijeet Dipke video : पोलिसांनी अभिजीत दिपकेंचा 'तो' व्हिडिओच आणला समोर; लगेच दिले प्रत्युत्तर, पहाटे 3.30 वाजता आई-वडिलांना त्रास द्यायचा होता का?

Delhi Police, Abhijeet Dipke arrest : दोन मिनिटे माझा फोन त्यांना मागितला होता. पोलिसांनी मला माझा फोन का दिला नाही? वकिलांशी बोलण्यासाठीही फोन मागितला. पण दिला नाही, असा आरोप अभिजीत दिपकेंनी केला आहे.
Abhijeet Dipke video
Abhijeet Dipke videoSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi protest latest news : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी विमानातच अटक केली होती. त्याचदिवशी त्यांच्या आजीचे निधन झाले. याबाबत दिपकेंना माहिती देण्यात आली होती, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. तर कुटुंबीयांनी पोलीस खोटं बोलत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता पोलिसांनी याबाबतचा व्हिडिओच समोर आणला आहे.

दिल्ली पोलिसांनी रविवारी याबाबत पत्रकार परिषद घेत व्हिडिओच मीडियाला दिला. पोलीस उपायुक्त नेहा यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिपके यांच्या आजीच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी त्यांच्याकडे गेले. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सर्वप्रकारची मदत करू, असेही सांगितले. प्रवास, फोन आणि आणखी काही मदत हवी असल्याबाबत विचारणा करण्यात आली.

पालकांशी बोलण्याबाबत सातत्याने विचारण्यात आले. पण त्यांनी नकार दिल्याचे यादव यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी दिपके आणि अधिकाऱ्यांमधील संवादाचा व्हिडिओही दाखविला. त्यामुळे एक सिव्हील ड्रेसमधील अधिकारी दिपके यांना आजीच्या निधनाबाबत माहिती देत असल्याचे दिसते.

Abhijeet Dipke video
Delhi protest : पोलिसांनी मर्यादा ओलांडल्या, खासदाराला बेदम मारहाण करून रस्त्याच्या कडेला टाकलं! पक्षाकडून Video पोस्ट, धक्कादायक दावा

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर दिपके यांनी लगेच सोशल मीडियातून त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजीसोबत राहणाऱ्या माझ्या चुलत भावाशी मला बोलू देण्याची विनंती केली होती. त्यांच्या फोन नंबरसाठी दोन मिनिटे माझा फोन त्यांना मागितला होता. पोलिसांनी मला माझा फोन का दिला नाही? वकिलांशी बोलण्यासाठीही फोन मागितला. पण दिला नाही.

Abhijeet Dipke video
Congress news : काँग्रेस कार्यालयात जोरदार राडा; 'मी राहुल गांधींचा हनुमान' म्हणणारा बडा नेता अन् नगरसेविका आमनेसामने; Video व्हायरल...

मला अनेक दिवस तुरूंगात जावे लागणार असल्याचे वडिलांना फोन करून सांगावे, असे दिल्ली पोलिसांनी पहाटे ३.३० वाजता सांगितले होते. वडिलांनी आपली आई गमावली आहे. आम्ही आजीला गमावले आहे. त्यानंतरही माझ्या कुटुंबाला किती मानसिक त्रास द्यायचा होता?, असा सवाल दिपकेंनी केला आहे. पहाटे ३.३० वाजता फोन करण्यास सांगण्यामागे पोलिसांचा नेमका उद्देश कोणता होता? कुटुंबाला मानसिक त्रास देऊन छळ करायचा होता का?, असा आरोप दिपकेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com