BJP Sarkarnama
देश

भाजपला धक्का! सर्वाधिक जागा पण बहुमतापासून दूरच

मणिपूर विधानसभा निवडणुकीचे हाती येत असून, सत्ताधारी भाजपला धक्का बसल्याचे चित्र आहे.

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) हाती येत असून, सत्ताधारी भाजपला धक्का बसल्याचे चित्र आहे. भाजपने 60 पैकी 19 जागांवर आघाडी घेतली असली तरी बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूर आहे. याचवेळी काँग्रेस आघाडीने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे स्पष्टपणे कोणत्याही पक्षाला कल दिसून आलेला नाही. इतर पक्षांशी आघाडी न करता एकला चलो रे ही भूमिका भाजपला महागात पडल्याचे दिसत आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. आता हाती आलेल्या निकालानुसार, भाजप हा 19 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 3 जागांवर तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 9, संयुक्त जनता दल 3 आणि नागा पीपल्स फ्रंट 4 जागांवर आघाडीवर आहेत.

मणिपूर पक्षनिहाय जागा

भाजप -19

काँग्रेस - 3

नॅशनल पीपल्स पार्टी – 9

संयुक्त जनता दल – 3

नागा पीपल्स फ्रंट – 4

मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. यातील पहिला टप्पा 28 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा 5 मार्चला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला होता. शहांसोबत भाजपचे बडे नेतेही मणिपूरमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह हे त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT