Nitish Kumar Sarkarnama
देश

Bihar Floor Test : नितीश कुमारांचं दणक्यात सेलिब्रेशन; मतदानाआधीच विरोधकांनी मानली हार

Rajanand More

Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे बहुमत चाचणीआधी विरोधकांकडून केले जात असलेले दावे फोल ठरले आहेत. सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा राष्ट्रीय जनता दलाकडून केला जात होता. त्याला नितीश कुमारांनी 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करत दणका दिला आहे.

नितीश कुमारांनी (Nitish Kumar) आरजेडीची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आज विधानसभेत त्यांच्या सरकारची बहुमत चाचणी होती. त्यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलासह भाजपचे (BJP) काही आमदार गायब असल्याच्या जोरदार चर्चा होत्या.

प्रत्यक्ष मतदानावेळी आरजेडीला (RJD) दणका बसला. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावर झालेल्या मतदानात विरोधकांच्या बाजूने 112, तर सरकारच्या बाजूने 125 सदस्यांनी मतदान केले. विरोधकांना दोन मते कमी मिळाली, तर सरकारचे बहुमतही तीनने कमी झाले होते. त्यानंतर नितीश कुमारांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रस्तावावर दोन्ही बाजूने जोरदार भाषणे झाली. नितीश कुमार यांच्या भाषणानंतर मात्र विरोधकांनी वॉकआउट करत मतदानावर बहिष्कार घातला. अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावेळीच सरकार बहुमत सिद्ध करेल, हे निश्चित होते. त्यामुळे विरोधकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

संख्या मतदानाआधीच विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट करत नितीश कुमारांचा मार्ग प्रशस्त केला. त्यानंतर मतदानाची केवळ औपचारिकता उरली होती. मतदानावेळी सरकारच्या बाजूने 129 आमदारांनी मतदान केले. सभागृहात एकही विरोधी आमदार उपस्थित नव्हते. त्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांनी सरकारने मांडलेला विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी जय श्रीरामचा नारा देत आनंद व्यक्त केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT