Bihar Floor test : तेजस्वी यादवांना मोठा धक्का; तीन आमदार नितीश कुमारांच्या गोटात

Tejashwi Yadav : बहुमत चाचणीआधीच तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाचे तीन आमदार विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहेत.
Tejashwi Yadav
Tejashwi YadavSarkarnama

Patna : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी आहे. सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा राष्ट्रीय जनता दलाकडून केला जात होता, पण आता याच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आरजेडीचे तीन आमदार नितीश कुमार यांच्या बाजूने गेल्याचे विधानसभेत पाहायला मिळाले. (Bihar Floor test)

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण झाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर मतदान सुरू आहे. आता उपाध्यक्षांकडे ही सूत्रं सोपवण्यात आली आहेत. ते जेडीयूचे नेते आहेत. एकीकडे अध्यक्षांना हटवल्यानंतर नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांना धोबीपछाड दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

बहुमतासाठी जेडीयूला 122 चे संख्याबळ आवश्यक आहे. त्यांच्याकडे 127 चे संख्याबळ असल्याचे सांगितले जात आहे, तर नितीश कुमार यांनी आरजेडीचे आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि आणखी एका आमदाराला आपल्या बाजूने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या आसनांवर बसले आहेत.

दरम्यान, अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर आता त्यावर आमदारांची भाषणे सुरू आहेत. काही वेळात बहुमत चाचणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्यामुळे नितीश कुमार सरकारची धडधड वाढू लागली आहे. मात्र, सध्याचे संख्याबळ पाहता त्यामुळे सरकार सहजपणे बहुमत सिद्ध करेल, असे दिसते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com