BJP Kerala state vice president s devan resigns Sarkarnama
देश

मोठा धक्का! जाहीर कार्यक्रमात भाजपच्या दिग्गज नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Kerala vice president sudden resignation : भाजपला केरळमध्ये मोठा धक्का! प्रदेश उपाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा देत जाहीर कार्यक्रमातून मोठी घोषणा केली. जाणून घ्या संपूर्ण राजकीय अपडेट.

Rashmi Mane

भाजपला केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. अभिनेता एस. देवन यांनी भारतीय जनता पार्टीच्या केरळ प्रदेश उपाध्यक्षपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. रविवार, 16 ऑगस्ट 2026 रोजी केरळमधील अलप्पूजा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे केरळ भाजपच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

एस.देवन यांनी कनचिकुलंगरा देवी मंदिरात आयोजित कार्यक्रमात आपल्या राजकीय निर्णयाची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांनी याच व्यासपीठावर पक्ष सोडण्याची घोषणा केली. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, देवन यांनी शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी आत्ममंथन केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला होता.

आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना एस. देवन म्हणाले, "मी ज्या राजकारणावर विश्वास ठेवतो, ते श्री नारायण गुरूंच्या आदर्शांवर, तत्त्वांवर आणि कार्यक्रमांवर आधारित आहे. केरळमध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाल्यानंतर आणि पक्षासोबत पाच वर्षे काम केल्यानंतर, मला जाणवले की मी त्या मार्गावर पुढे चालू राहू शकत नाही. यानंतर, मला जाणवले आणि जाणीव झाली की माझा मार्ग वेगळा आहे, आणि याच्या आधारावर मी चार-पाच महिन्यांपूर्वी काही निर्णय घेतले."

एस. देवन यांची राजकीय कारकीर्द 2004 पासून सुरू झाली. त्यांनी केरळ पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. देवन यांनी 2004 आणि 2006 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2021 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार देवन यांनी आपल्या केरळ पीपल्स पार्टीचे भाजपमध्ये विलीनीकरण केले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले आणि केरळ प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.

देवन यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी माझा राजीनामा आधीच सादर केला आहे. मी राज्य उपाध्यक्ष पदावरून तसेच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्राथमिक सदस्यत्वावरून राजीनामा देत आहे..”

याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी आत्मपरीक्षण केल्यानंतर त्यांनी अंतिम निर्णय घेतला आणि मंदिरातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या साक्षीने तो जाहीर करण्याचे ठरवले.

दरम्यान, एस. देवन यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यक्रमात उपस्थित असलेले भाजप नेते बी. राधाकृष्ण मेनन यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मंदिरातील कार्यक्रमाच्या व्यासपीठाचा राजकीय राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT