

UGC NET जून 2026 परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी ने इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या ३ विषयांची परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये चुका, चुकीचे पर्याय आणि भाषेचा संबंधित त्रुटी असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत NTA ने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.
UGC NET June 2026 परीक्षा 22 जून ते 30 जून 2026 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 87 विषयांसाठी घेण्यात आली होती. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये Junior Research Fellowship (JRF), Assistant Professor पदासाठी पात्रता तसेच Ph.D. प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
परीक्षेनंतर इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी NTA कडे केल्या. काही प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय आणि भाषेच्या समस्याही असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या 3 विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन विषयांच्या फेरपरीक्षेबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
दरम्यान, NTA ने UGC NET June 2026 परीक्षेच्या 84 विषयांची प्रोव्हिजनल आन्सर-की Provisional Answer Key जाहीर केली आहे. ही आन्सर-की अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या विषयांची आन्सर-की जाहीर करण्यात आलेली नाही.
NTA ने विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल आन्सर-की वर आक्षेप नोंदवण्याची संधीही दिली आहे. प्रत्येक प्रश्नावर अक्षेप करण्यासाठी 200 रुपये Processing Fee ऑनलाइन भरावी लागणार आहे. उमेदवारांना 16 ते 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन आक्षेप नोंदवता येणार आहेत.
NTA कडून इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. नवीन परीक्षेचे वेळापत्रक, Admit Card आणि इतर महत्त्वाच्या सूचना अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी पुनर्परीक्षेची तयारी सुरू ठेवावी आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ NTA च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीकडे लक्ष द्यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.