Youth Congress Leader Fairoz Pathan Murdered Sarkarnama
देश

BJP leader killed : भाजप नेत्याची घराबाहेर निर्घृण हत्या; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

West Bengal BJP leader murder latest news : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची घराबाहेर निर्घृण हत्या झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Rashmi Mane

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळल्याचे चित्र आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारूईपूर परिसरात दुर्गापूजा समितीच्या नियंत्रणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. या मारामारीत भाजप कार्यकर्ता बापी प्रामाणिक (वय 45) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

ही घटना रविवारी रात्री हरदह ग्रामपंचायत परिसरातील उत्तर टांगेरबेरिया येथे घडल्याची माहिती आहे. दुर्गापूजा समितीचे नियंत्रण कोणत्या गटाकडे असणार, यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. याच संघर्षादरम्यान बापी प्रामाणिक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या हत्येप्रकरणी बापी प्रामाणिक यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक निलंबित भाजप नेते सुजन मंडल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सुजन मंडल यांच्या कटानुसार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बापी यांना घराबाहेर बोलावले आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुजन मंडल यांच्याबाबत वेगळी माहिती दिली आहे. सुजन मंडल यांची काही दिवसांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजप राज्य समितीचे सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष उत्तम कर यांनी या घटनेमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ज्या भाजप नेत्यावर कुटुंबीयांकडून आरोप करण्यात येत आहेत, त्याला पक्षातून आधीच काढून टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटनाही चर्चेत होती. निवडणुका होऊन 3 महिने उलटले असतानाही राज्यातील राजकीय वातावरण शांत झालेले नसल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT