CJP News : कॉकरोच जनता पार्टीत मोठे फेरबदल! ‘या’ नवीन चेहऱ्यांकडे सोपवली राष्ट्रीय प्रवक्त्याची धुरा!

Cockroach Janata Party national spokesperson : कॉकरोच जनता पार्टीने राष्ट्रीय प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर केली आहे. कोणत्या नव्या चेहऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली? जाणून घ्या सविस्तर.
CJP News : कॉकरोच जनता पार्टीत मोठे फेरबदल! ‘या’ नवीन चेहऱ्यांकडे सोपवली राष्ट्रीय प्रवक्त्याची धुरा!
Published on
Updated on

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले आहेत. पक्षाने राष्ट्रीय प्रवक्त्यांसह संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सीजेपीच्या संघटन विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

पक्षाने सुधीर सांगवान आणि सिद्धांत भारद्वाज यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी सौरभ दास आणि आशुतोष रांका हे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. मात्र, दोघांनाही राष्ट्रीय सह-संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर प्रवक्त्यांची पदे रिक्त झाली होती. आता या पदांवर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

CJP News : कॉकरोच जनता पार्टीत मोठे फेरबदल! ‘या’ नवीन चेहऱ्यांकडे सोपवली राष्ट्रीय प्रवक्त्याची धुरा!
NITI Aayog Report : नीती आयोगाकडूनच शिक्षण व्यवस्थेची पोलखोल, बेरोजगारीचा आकडा वाचून बसेल धक्का!

सीजेपीने आपल्या संघटनेत आणखी महत्त्वाच्या नियुक्त्याही केल्या आहेत. राष्ट्रीय संघटन महासचिवपदासाठी रेखा शर्मा, अक्षय शिंदे, प्रेम आकाश, अनाम उज्जमा आणि बालाकृष्ण शुक्ला यांना जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

सीजेपीच्या सुरुवातीच्या काळात 3 राष्ट्रीय प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी विजेता दहिया यांना 20 जुलै रोजी झालेल्या बर्गर वादानंतर पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर संघटनेतील पदांमध्ये बदल होत गेले.

दरम्यान, पक्षाने नॉर्थ झोनसाठी को-ऑर्डिनेशन कमिटीचाही विस्तार केला आहे. आदेश प्रधान गुर्जर, अजाद मोहित, मोहम्मद फरहान खान, विश्वेष कर्नवाल, उज्ज्वल पांडे, पूजा सैनी, आफताब सिंह विर्क, अर्शदीप सिंह कोचर, जाहिद अहमद माले, महविश अली, श्रेष्ठ सिंह खेरा, अजय देशवाल, डॉ. विवेक सांगवान, मुकेश ऑलराउंडर, राम जाखड़, हर्ष कार्तिकेय सिंह आणि अॅडव्होकेट आरुषी घई यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

CJP News : कॉकरोच जनता पार्टीत मोठे फेरबदल! ‘या’ नवीन चेहऱ्यांकडे सोपवली राष्ट्रीय प्रवक्त्याची धुरा!
Top 10 News : भाजप आमदाराच्या लेकीने थेट PSI सविता पाटीलला लगावली कानशिलात ; माजी मुख्यमंत्र्यांचं संन्यासावर मोठं वक्तव्य..; वाचा टॉप 10 घडामोडी!

विशेष म्हणजे, सीजेपीने संघटन विस्ताराची घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा पक्षाने दिल्लीतील आगामी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 5 सप्टेंबर रोजी इंडिया गेट ते पोलीस मुख्यालय असा प्रोटेस्ट मार्च काढण्याची घोषणा पक्षाने केली आहे. केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत सीजेपीने या आंदोलनाची घोषणा केली आहे.

नवीन राष्ट्रीय प्रवक्त्यांची नियुक्ती, संघटनेचा विस्तार आणि आगामी दिल्ली आंदोलन यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com