BJP leader shot dead in broad daylight Sarkarnama
देश

BJP Leader Murder: भाजप नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; अर्धा तास मृतदेह रस्त्यावरच, परिसरात खळबळ!

Shocking murder of BJP leader creates panic: भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Rashmi Mane

BJP leader killed after gun attack: भाजपचे स्थानिक नेते आणि नगरसेवक कल्लू कुशवाह यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मध्यप्रदेशातील प्रचंड खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्लू कुशवाह नेहमीसारखे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळीच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्यांचा वर्षाव इतका तीव्र होता की कुशवाह यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणात ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर तेथून फरार झाले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. घटनेनंतर अर्धातास त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. यामुळे परिसरातील लोकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले होते.

हत्येच्या प्राथमिक चौकशीत या हत्येमागे वैयक्तिक वैर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कल्लू कुशवाह यांच्यावर यापूर्वी एका खून प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यासह त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप देखील होते. मात्र त्यांना चार महिन्यापूर्वी जामीन मिळाला होता. त्यामुळे ते तुरुंगाबाहेर आले होते.

घटनेची माहिती मिळताच दतिया जिल्हा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT