Ashok Kharat office findings : SIT च्या हाती मोठं घबाड! अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय सापडलं?

Ashok Kharat office raid evidence : अशोक खरात प्रकरणात SIT चा मोठा खुलासा. ऑफिस छाप्यात महत्त्वाचे पुरावे सापडले, वाचा संपूर्ण माहिती.
SIT investigation Ashok Kharat case
SIT investigation Ashok Kharat case Sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपास वेगाने पुढे सरकत आहे. रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून, विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, खरातच्या कार्यालयात घेतलेल्या झडतीत अनेक संशयास्पद गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

तपासाच्या प्रक्रियेत घटनास्थळाचे रिक्रिएशन करण्यात आले. या वेळी पीडित महिलेला त्या कार्यालयात नेण्यात आले होते. ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे, त्या जागी परत गेल्यानंतर ती भावूक झाली आणि तिला आपले अश्रू रोखता आले नाहीत. तिच्यासाठी हा प्रसंग अत्यंत वेदनादायक असला तरी, तपासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक मानली जात आहे.

SIT investigation Ashok Kharat case
Ashok Kharat case full story : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा 'काळा अध्याय' अखेर संपला! 10 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

कार्यालयात सापडलेल्या वस्तूंनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तपास पथकाने जप्त केलेल्या साहित्यामध्ये खराब झालेले पेढे, काळ्या रंगाची काही फळे आणि विविध प्रकारच्या जडीबुटींचा समावेश आहे. याशिवाय, लोकांना फसवण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय असलेली काही यंत्रेही आढळून आली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भक्तांच्या नावांची नोंद असलेली एक वही सापडली असून, त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपास अधिक सखोल करण्यासाठी कार्यालयाच्या रचनेचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. दरवाजे, खिडक्या आणि विशेषतः साऊंडप्रूफ काचा यांची फॉरेन्सिक तज्ञांकडून तपासणी सुरू आहे. बाहेर आवाज जाऊ नये यासाठी काही खास यंत्रणा बसवण्यात आली होती का, याचा शोध घेतला जात आहे.

SIT investigation Ashok Kharat case
Ashok Kharat SIT Investigation : अशोक खरातकडील 'त्या' गुंगी आणणाऱ्या पेढ्यात नेमकं काय? SIT लावणार छडा, कोर्टात काय दिली माहिती?

धर्म आणि श्रद्धेच्या आडून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातविरोधात मिळालेल्या या पुराव्यांमुळे तपास अधिक मजबूत होत आहे. पुढील काळात या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com