MP Navneet Rana News, Ravi Rana News, Kirit Somaiya Latest News
MP Navneet Rana News, Ravi Rana News, Kirit Somaiya Latest News  Twitter
देश

दिल्लीत राजकीय घडामोडी; शेलारांपाठोपाठ सोमय्यांचीही राणा दाम्पत्यांसोबत खलबत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीत ठाण मांडून असलेल्या राणा दाम्पत्यांच्या भेटीगाठी अद्याप सुरु आहेत. आज खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi rana) यांची त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जावून भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भेट घेतली. यापूर्वी मुंबईतही लीलावती हाँस्पिटलमधे सोमय्या यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. त्यानंतर आता दिल्लीतही सोमय्या राणा दाम्पत्याला साथ देताना दिसत आहेत. (Navneet Rana Ravi Rana Latest News)

दरम्यान मागील आठवड्यात राणा यांनी दिल्लीत जावून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबतचा तक्रारींचा पाठा वाचला होता. त्यानंतर काल (बुधवारी) भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील राणा दाम्पत्यांची भेट घेतली होती आणि पत्रकार परिषदेपूर्वी हात उंचावून शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल :

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काल पत्रकार परिषद घेवून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. रवी राणा म्हणाले, "सुप्रीम कोर्टानं इंग्रजकालिन राजद्रोह कायदा (Sediton Law) आता कायदा मोडून काढला आहे. ठाकरे सरकारनं चुकीच्या पद्धतीने आमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यापासून महाराष्ट्राची ही दशा झाली आहे. न्यायालयाने हा कायद्या स्थगित केल्यामुळे आम्ही न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत,"

"आमच्या मुंबईतील सदनिकेवर मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. लीलावती रुग्णालयावर शिवसेनेने कारवाईची नोटीस बजावली आहे. ही नोटीस चुकीची आहे. शिवसेनेकडून डाँक्टराचा अवमान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा गैरवापर करीत आहेत," असा आरोप रवी राणा यांनी केला.

हनुमान चालिशा मागे आमचा चांगला हेतू होता. मुंबईतील खार येथील आमच्या सदनिकेत आम्ही कुठलेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. ठाकरेंच्या सांगण्यावरुन आमच्या सदनिकेवर ही कारवाई करण्यात येत आहे," असे राणा म्हणाले.

"आमचे घर पाडा, पण लीलावती रुग्णालयावर कारवाई करु नका," असे रवी राणा म्हणाले. "मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला आहे. भविष्यात मुख्यंमत्र्यांकडून पांडेंना काहीतरी मिळणार आहे, या आमिषाने पांडेंनी ही कारवाई केली आहे. "मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आम्ही प्रचार करणार आहोत," असे रवी राणा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT