<div class="paragraphs"><p>E Sreedharan</p></div>

E Sreedharan

 

Sarkarnama

देश

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार निवडणूक हरले अन् आठ महिन्यांतच सोडलं राजकारण!

सरकारनामा ब्युरो

तिरूअनंतपुरम : केरळ विधानसभेच्या (Kerala Assembly) एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत डाव्यांनी चाळीस वर्षांचा इतिहास मोडून काढला. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होतो. पण यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन (P. Vijayan) यांचा करिष्मा पाहायला मिळाला. याच ही निवडणूक भाजपने (BJP) प्रतिष्ठेची केली होती. मेट्रोमॅन (MetroMan) म्हणून प्रसिध्द असलेल्या 88 वर्षांच्या ई. श्रीधरन (E. Sreedharan) यांना पक्षात प्रवेश देत त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्टही केले होते.

निवडणुकीत श्रीधरन यांचा पराभव झाला अन् त्यानंतर ते राजकारणापासूनच दुरावू लागले. अखेर त्यांनी गुरूवारी सक्रीय राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीत डाव्या आघाडीने 97 जागा जिंकत काँग्रेस (Congress) आघाडीला धुळ चारली. तर भाजपला मागील वेळची एक जागाही राखता आली नाही. त्यामुळे भाजपवर नामुष्की ओढवली.

भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी श्रीधरन हे भाजपकडून मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही करून टाकली होती. पण भाजपकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात येत असल्याचे श्रीधरन यांनी त्यावेळी म्हटले होते. विधानसभेत मी एकटा काही करू शकत नाही. भाजपला सत्ता द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं होतं.

पण या निवडणुकीत श्रीधरन यांच्या पराभवासह एक जागाही गेली. ई. श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून विजयी होतील, अशी अपेक्षा भाजपला होती. त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत लढत दिली होती. पण 3 हजार 859 मतांनी त्यांचा पराभव झाला. श्रीधरन यांनी मुख्यमंत्री पदाशिवाय ध्येय पूर्ण करता येणार नाहीत, असे वक्तव्यही सुरूवातीला केले होते. पण त्यांच्यासह भाजपही विजयापासून दूर राहिले.

या पराभवानंतर श्रीधरन खूप निराश झाल्याचे बोलले जात होते. राजकीय कार्यक्रमांपासूनही ते दूर राहिले होते. निवडणुकीनंतर ते केवळ त्यांच्या सामाजिक कामांमध्येच दिसत होते. भाजपच्या व्यासपीठापासूनही ते दूर राहिले होते. त्यामुळे ते राजकारणातून दूर जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांनीच गुरूवारी याबाबत घोषणा करून चर्चेवर पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT