Ranjith Sreenivasan Sarkarnama
देश

BJP Leader Murder Case : भाजपच्या ओबीसी नेत्याच्या हत्येप्रकरणी 15 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

Rajanand More

Kerala News : केरळमधील भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी स्थानिक न्यायालयाने चार वर्षांनंतर निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात सर्व 15 आरोपींना दोषी धरत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्वजण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित आहेत.

केरळमध्ये भाजप (BJP) ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन (Ranjith Sreenivasan) यांची 19 डिसेंबर 2021 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अलाप्पुझा येथील श्रीनिवासन यांच्या घरातच कुटुंबीयांसमोर आरोपींनी हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या हत्येमध्ये आठ जणांचा सहभाग होता. इतर सात जण हत्येच्या षड्यंत्रात सहभागी होते. (BJP Leader Murder Case)

मावेलीक्कर येथील जिल्हा न्यायालयाने सर्व 15 आरोपींना शनिवारी हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. आई, पत्नी आणि लहान मुलासमोर ही हत्या करण्यात आली. त्यामुळे हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असल्याने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयानेही सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. श्रीनिवासन यांच्या हत्येनंतर केरळमध्ये (Kerala) भाजपने सरकारविरोधात रान उठवले होते. राजकीय हेतूने भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हत्या केल्या जात असल्याचा आरोप भाजपने सत्ताधारी पक्षावर सातत्याने केला जातो.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT