New Delhi News : कथित भूखंड घोटाळाप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याभोवती सक्तवसूली संचालनालयाकडून फास आवळण्यात आला आहे. ईडीने सोमवारी दिल्लीतील सोरेन यांच्या घरी धाड टाकली होती. यावेळी मुख्यमंत्री घरी नव्हते. त्यानंतर ईडीने मुख्यमंत्र्यांच्या दोन बीएमडब्ल्यू कार, काही महत्वाची कागदपत्रे आणि 36 लाखांची रोकड जप्त केली आहे. (Hemant Soren ED Enquiry)
भूखंड घोटाळाप्रकरणी सोरेन यांना ईडीकडून (ED) अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोरेन हे रविवारी रात्री दिल्लीतील घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीने सोमवारी छापेमारी केली. मात्र, तिथे मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे जवळपास 13 तास अधिकारी त्यांची वाट बघत घरीच होते. यादरम्यान त्यांनी घराची झडती घेतली.
घरातील तपासामध्ये ईडीला काही महत्वाची कागदपत्रे सापडल्याचे समजते. तसेच 36 लाखांची रोकडही मिळून आली. घराच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारही ईडीने जप्त केल्या आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे आता सोरेन यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, ईडीने 20 जानेवारीला पहिल्यांदा सोरेन यांची चौकशी केली होती. मागील आठवड्यात त्यांना नोटीस पाठवून ईडीने 29 ते 31 जानेवारीदरम्यान चौकशीसाठी वेळ देण्याचे कळवले होते. त्यानंतर सोरेन यांनी 31 तारखेला दुपारी एक वाजता ईडीला वेळ दिल्याचे समजते.
ईडीच्या यांची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका सोरेन यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांकडून केली जात आहे. या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी मोर्चाही काढला होता. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जात असल्याची टीका सोरेन यांच्याकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.