Sonali Phogat Passes Away|
Sonali Phogat Passes Away| 
देश

Sonali Phogat Passes Away|भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सरकारनामा ब्युरो

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. (Sonali Phogat Passes Away) सोनाली फोगट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. ती 43 वर्षांच्या होत्या. सोनाली फोगट या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा होत्या.

हरियाणातील हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. पण सोनालीची ओळख त्याहून खूप जास्त आहे. सोनाली फोगट एक अभिनेत्री होत्या त्यांनी. दूरदर्शनवर शो अँकर केले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टिकटॉक स्टार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

2006 मध्ये सोनाली फोगाट यांनी हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. मात्र 2016 मध्ये अचानक त्यांचे पती संजयचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तेव्हा त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मात्र त्यावेळी मुंबईत होत्या.

जून 2020 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सोनाली फोगट एका अधिकाऱ्याला चप्पलने मारताना दिसत होत्या. यावरून बराच गदारोळ झाला होता. 8 ऑक्टोबर 2019 मध्येही सोनाली फोगाट त्यांच्या एका भाषणामुळे वादात अडकल्या होत्या. हिसारमधील एका गावात रॅलीदरम्यान त्यांनी लोकांना 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर, जे घोषमा देत नाहीत ते नक्कीच पाकिस्तानचे आहेत. असेही वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्यावरुन त्यांना नंतर माफीही मागावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT