मुंबई : पत्राचाळ घोटाळा (Patra chawl scam) प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांना समन्स बजावले आहेत. याच प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही ईडीने अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने त्यांची कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
असे असतानात दूसरीकडे आता ईडीने स्वप्ना पाटकर यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर स्वप्ना पाटकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊतांववर काही आरोपही केले आहेत.
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर या महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. त्यातच आता ईडीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय स्वप्ना पाटकर यांचे पती सुजीत पाटकर यांचीही ईडीने चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीवेळी सर्व कागदपत्रेही दिली होती. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवल्याने या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. (Sanjay Raut | ED Arrest | Latest news)
याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.