Abhishek Banerjee, Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी साहिबा, कोणता धर्म घाणेरडा आहे?

Suvendu Adhikari Mamata Banerjee Controversy West Bengal Politics 2025 Latest News : राज्यातील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियात ममतांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Rajanand More

West Bengal Politics : रमझान ईदच्या दिवशीच पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका विधानावरून राजकारण तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेत्यांनी ममतादीदींवर टीकास्त्र सोडले आहे. ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात ममतांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राज्यातील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियात ममतांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी कोणता धर्म घाणेरडा आहे, ममता बॅनर्जी साहिबा, असा सवालही केला आहे. अधिकारी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी तुम्ही तुमच्या समजू न शकलेल्या ऊर्दू भाषेत बोललात की, तुम्ही ‘घाणेरडा धर्म’ किंवा डर्टी रिलिजन चे पालन करत नाही.

तुम्ही कोणत्या धर्माविषयी बोलत होता? सनातन हिंदू धर्म?, असे सुवेंदू अधिकारी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बॅनर्जी यांनी वारंवार दंगा शब्दाचा उल्लेख केला, असा आरोपही त्यांनी केला. तसेच हा कार्यक्रम धार्मिक होता की राजकीय, सा सवालही अधिकारी यांनी केला. असे काम तुमच्याच विरोधात जाईल, असा इशाराही अधिकारी यांनी दिला आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममतांवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सनातन धर्म घाणेरडा धर्म आहे का? त्यांच्या कार्यकाळात अनेकदा हिंदूविरोधात दंगली झाल्या. त्यानंतरही त्यांच्या धर्माचा अपमान करण्याची हिंमत करत आहेत. पुन्हा एकदा, त्यांनी हिंदूंना निशाणा करण्याची सूट मुस्लिमांना दिली आहे, अशी टीका मालवीय यांनी केली.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी ईदच्या कार्यक्रमात बोलताना आपण सर्व धर्मांसाठी आपले आयुष्य बलिदान करण्यासाठी तयार असल्याचे घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर धार्मिक दंगली भडकवल्या जात असल्याचा आरोपही केला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT