
BJP News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद जवळपास गेल्या दहा महिन्यापासून अधिक काळापासून रिक्त आहे. देशातील विविध राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण होत नसल्याने ही निवड प्रक्रिया रखडली होती. आता काही राज्यातील संघटनात्मक निवडी पूर्ण झाल्याने आता लवकरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास सहा नावाची चर्चा आहे. त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातील असून या आठवडाभरात राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
भाजपचा (BJP) नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. भाजपचा स्थापना दिवस 6 एप्रिलला होत आहे. तत्पूर्वी म्हणजे 5 एप्रिलपर्यंत भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यातील संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये अनेक गोष्टी महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामध्ये प्रादेशिक संतुलन, महिला नेतृत्व, दलित प्रतिनिधीत्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, देशातील बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही दिवसातच संघटनात्त्मक निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह विराजमान झाले होते. तर 2019 मध्ये जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यानंतर नड्डा यांना केंड्रिय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.