BJP leaders and students stage a protest outside Jharkhand Chief Minister Hemant Soren's residence over the JSSC exam controversy. sarkarnama
देश

JSSC Exam Scam : भाजप नेत्यांनी राहुल गांधींचा मार्ग स्वीकारला, थेट मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर...

BJP Leaders Protest Student March : झारखंडमध्ये विधानसभेला घेरावा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांना अडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Roshan More

Student March : झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील घोटाळ्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी आज विधानसभेवर मोर्चा देखील काढला. दरम्यान, जंतरमंतर आंदोलनाच्यावेळी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर जात धरणे दिले होते. तोच मार्ग रांचीमध्ये भाजप नेत्यांनी स्वीकारला.

विद्यार्थी मोर्चा काढत असताना भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घराबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी तातडीने आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे भाजपचे नेते बाबुलाल मरांडी यांनी सांगितले की,मागील 15 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सीबीआयकडून चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांच्या निवास्थानी चाललो होते. मात्र आम्हाला त्यांच्या निवास्थानाबाहेर थांबण्यात आले. सरकारला या हुकुमशाहीचे उत्तर द्यावे लागेल. झारखंडच्या विद्यार्थ्यांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

विधानसभेवर मोर्चा

रविवारी विद्यार्थी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा झाली. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या 98 टक्के मान्य केल्याचे सांगण्यात आले. मात्र,विद्यार्थी हे सरकारच्या तोडग्यावर समाधानी नव्हते.अखेर त्यांनी पूर्व नियोजित विधानसभेवरील मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी जाहीर केल्या प्रमाणे आज त्यांच्या विधानसभेवर मोर्चा निघाला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सरकारने पाण्याचे फवारे मारत विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT